महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी पर्यटन

महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी,महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी मारली असून  सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार आज राज्याला प्रदान करण्यात आला. यासह विविध श्रेणीतील एकूण 9 पुरस्कार राज्याला आज प्रदान करण्यात आले.येथील विज्ञान भवनात जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2018-19 चे ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनकर, केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी, केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री अजय भट, केंद्रीय पर्यटन सचिव अरविंद सिंह, अतिरीक्त सचिव राकेश वर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.

 या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते प्रमुख 11 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तर उर्वरित पुरस्कारांचे वितरण केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.महाराष्ट्राला सर्वोकृष्ट राज्यासाठीचा सर्वकष पर्यटन विकासाचा व्दितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक, डॉ. धनंजय सावळकर यांनी पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने हा पुरस्कार  स्वीकारला.

पर्यटन क्षेत्रातील विविध सेवा सुविधा पुरविणा-या शासकीय संस्थांसोबतच खाजगी सेवा पुरविणा-या संस्थांनाही  राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये ही महाराष्ट्राने मोहर उमटव‍िली आहे. पर्यटकांना उत्कृष्ट नागरी सुविधा पुरविल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील पाचगणी नगर पर‍िषदेला राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी आणि पाचगणी चे मुख्यकार्यकारी अधिकारी गिरीष दापकेकर यांनी स्वीकारला.

मुंबईतील ताजमहाल पॅलेस या पंचतारांकीत  डिलक्स हॉटेलला ‘पंचतारांकीत हॉटेल’ श्रेणीतील चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पश्चिम विभागातील उत्कृष्ट निरोगता (वेलनेस) केंद्र या श्रेणीतील पुरस्कार पुण्यातील आत्मंतन वेलनेस, मुळशी (पुणे) यांना प्रदान करण्यात आला.ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या श्रेणीतील  पुरस्कार चंदन भडसावळे यांना सगुनाबाग (नेरळ) येथे सुरू केलेल्या ग्रामीण पर्यटन केंद्राला प्रदान करण्यात आला.

 द वेस्टर्न रूट्स या ट्रॅव्हल कंपनीला जबाबदार पर्यटन प्रकल्पातंर्गत उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार श्री. परांजपे यांनी स्वीकारला.पर्यटक वाहतूक परीचालक श्रेणी -2 मधील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मुंबईतील गीती ट्रॅव्हल्स यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मनमाहेन गोयल यांनी स्वीकारला. पर्यटक परिवहन संचालक श्रेणी-1 मधील व्द‍ितीय क्रमांचा पुरस्कार ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस मर्यादित ला प्रदान करण्यात आला.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाव्दारे परवाना प्राप्त अतुल्य भारत बेड एंड ब्रेकफास्ट (गोल्डन आणि सिल्वर) या श्रेणीतंर्गत पाचगणी येथील डाला रूस्टर, होमस्टे ला उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल  पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कॅप्टन विकास गोखले आणि श्रीमती गोखले यांनी स्वीकारला.

सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा  पुरस्कार स्वीकारल्यानंतर  सहसंचालक, डॉ. धनंजय सावळकर म्हणाले, या पुरस्काराने आम्हाला आगामी काळात पर्यटन विकासाच्या कार्यास प्रेरणा व उर्जा मिळणार. वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे, वाहतूकीचे विकसित जाळे, निवासाच्या दर्जेदार सुविधा आणि अनुभवजन्य पर्यटनाच्या आधारावर आगामी काळात औद्योगिक क्षेत्रातील आघाडी प्रमाणेच पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर राहील. शाश्वत पर्यटन, सुरक्षित पर्यटन व अनुभवजन्य पर्यटन या त्रिसूत्रीवर आधारीत पर्यटन विकासाचे मॉडेल आगामी काळात महाराष्ट्रात उभारले जाईल, अशी प्रतिक्रीया श्री सावळकर यांनी दिली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »