महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image क्रिडा चर्चेची बातमी

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, कबड्डी महिलांमध्ये पुणे व रायगडची आगेकूच

नेशन न्यूज मराठी टीम.

बारामती/प्रतिनिधी – विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या पुणे संघाने रायगड व मुंबई उपनगर यांच्यासह राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या गटात आगेकूच कायम राखली. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणे संघाने नागपूर संघाचा ५२-१४ असा धुव्वा उडविला. मध्यंतराला ३६-५ अशी आघाडी घेत त्यांनी आपला विजय निश्चित केला होता. त्याचे श्रेय आम्रपाली गलांडे व अंकिता जगताप यांच्या चतुरस्त्र खेळास द्यावे लागेल.

मुंबई उपनगर संघाने आपले पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई शहर संघाला ४८-३६ असे पराभूत केले.‌ त्यावेळी पूर्वार्धात त्यांनी २३ विरुद्ध १७ अशी सहा गुणांची आघाडी घेतली होती. मुंबई उपनगर संघाकडून हरदीप कौर, याशिका पुजारी व प्रांजल पवार यांनी अष्टपैलू खेळ केला.‌ मुंबई शहर संघाकडून मेधा कदम व प्रतीक्षा तांडेल यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

रायगड संघाने अमरावती संघावर ३३-१९ अशी मात केली त्यावेळी पूर्वार्धात त्यांच्याकडे १८-१० अशी आघाडी होती. रायगड संघाच्या या विजयाचे श्रेय तेजा सकपाळ व रचना मात्रे यांच्याकडे द्यावे लागेल. अमरावती संघाकडून बरखा गेडाम व मंगला राऊत यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.‌पुरुष गटात मुंबई शहर संघाने विजयी वाटचाल कायम राखताना धुळे संघावर ४६-१६ असा दणदणीत विजय नोंदविला त्यावेळी मध्यंतराला त्यांनी ३१-१० अशी भक्कम आघाडी घेतली होती. मुंबई शहर संघाच्या या विजयात सुशांत नाईक व मयूर शिवतीर्थकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. धुळे संघाकडून दिनेश अहिरराव याची लढत एकाकी ठरली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »