नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जळगाव/प्रतिनिधी – भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जामनेर येथे तेल व्यापाऱ्याची रोख रक्कम भर रस्त्यात तीन अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी पिस्टलचा धाक दाखवून रकमेची पिशवी जबरीने हिसकावुन घेत जामनेरच्या दिशेने पळ काढला होता.
फिर्यादीने तक्रार नोंदवताच सपोनि विशाल पाटील यांच्या नेतृत्वात अज्ञात फरार आरोपींचा पोलिस पथक शोध घेत होते. गोपनीय बातमीदार व तांत्रिक विष्लेशनाच्या साहाय्याने तपास पथकातील पोलिसांना दोन आरोपी आणि दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. नंतर त्यांना भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला आणून विश्वासात घेऊन विचारपुस करण्यात आली. या दरम्यान त्यांनी गुन्ह्यांची कबुली देखील दिली आहे.
सदर आरोपींकडून गुन्हयांतील जबरीने चोरून नेलेली दहा लाखाची रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली पाच लाखाची चारचाकी बोलेरो गाडी अशी एकूण १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.