WWW.NATIONNEWSMARATHI.COM
संभाजीनगर/प्रतिनिधी – छत्रपती संभाजी नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोवा येथून विदेशी दारू येत असल्याची माहिती मिळाली असता छत्रपती संभाजी नगर- बीड दरम्यान भालगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. गोवा येथून चार चाकी वाहनांमध्ये तब्बल चार लाख 76 हजार रुपये किंमतीचे मद्य पोलिसांनी जप्त केले आहे.
भालगाव कमानी जवळ संशयित एक कार दिसली. त्या कारची तपासणी केली असता त्यात गोवा येथील मद्य आढळून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ४ लाख ७६ हजारांचे मद्य जप्त केले आहे. त्यानुसार कारवाई करून चालक विष्णू गळकर याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली आहे.



