कल्याण प्रतिनिधी– राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत कल्याण शहर वाहतूक शाखेतर्फे विविध माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात आहे .आज माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याणात वाहतूक नियमांबाबत जनजागृतीसाठी चक्क बाल गणेशा अवतरले .स्टेशन परिसरात पथनाट्याच्या आधारे वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात आली .यावेळी लहान मुल बाप्पाचा वेष परिधान करत रस्त्यावर उतरले होते। यावेळी या बाल गणेशाने विना हेल्मेट दुचाकी स्वाराना ,विना माक्स रिक्षा चालकांना ,बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देत वाहतूक नियमांचे पालन करन्याच आवाहन केलं
Related Posts



