नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई सायबर पोलिसांनी एका जेष्ठ नागरिकाची 43 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्याला राजस्थान वरून अटक केले आहे. अश्लील व्हीडिओ रेकॉर्डिंग करत तो वायरल करण्याची धमकी देत आरोपीने विविध बँक खात्यात तब्बल 43 लाख 22 हजार 900 रुपये स्वीकारले. मात्र आरोपीने वारंवार ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केल्याने अखेर पीडित जेष्ठ नागरिकाने नवी मुंबई सायबर पोलिसांना तक्रार केली.
पोलिसांनी तात्काळ तपास करत राजस्थान मधील डिग जिल्ह्यातील पालदी गावात राहणाऱ्या आरोपीला अटक केली. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून त्याच्याकडून अनेक मोबाईल फोन, सिम कार्ड तसेच एटीएम कार्ड जप्त केलेत. सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.



