महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

अमली पदार्थ प्रकरणात कोळशेवाडी पोलिसांची मोठी कारवाई – दोघांकडून  कोडेन फॉस्फेट सिरप व गोळ्याचा साठा जप्त

DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, कल्याण यांच्या आदेशानुसार कोळसेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत हे बेकायदेशीर अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून कोडेन फॉस्फेट सिरप व अल्पझोलाम गोळ्याचा साठा हस्तगत करण्यात आला असून, या कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारी नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे.कोळसेवाडी पोलीस पथक मॉल परिसरात २२ एप्रिल २०२५ रोजी  २.३० वा. दरम्यान गस्त घालत असताना, मेट्रो मॉल समोर सार्वजनिक रस्त्यावर रिक्षा स्टॅन्ड जवळ उभी असलेल्या रिक्षात दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. सदर रिक्षा क्रमांक एम.एच.०३- सी.एन.८११० मध्ये मोहम्मद रफीक अब्दुल सलाम वय ४६ वर्ष व अब्दुल सादिक अब्दुल कलाम शेख वय ४८ वर्ष दोघेही राहणार कुरेशी नगर, कुर्ला, मुंबई हे बसलेले होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी पंचासमक्ष तपासणी केली असता, त्यांच्या ताब्यातील सॅगबॅगमधून कोडेन फॉस्फेट सिरप, अल्प्राझोलाम ५ मी. ग्रॅ. व अल्प्रतन गोळ्या असा एकूण २७,०८० किंमतीचा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला.
सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. ॲक्ट १८८५ अंतर्गत कलम ८(क) ,२२ (ब) ,२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आले आहे. ही विशेष कारवाई मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी नाईक, अनिल गायकवाड, जितेंद्र ठोके तसेच पोलीस पोलीस शी. अमित शिंदे, खुशाल नेरकर ,राहुल शिंदे यांच्या पथकाने सदर कारवाई केली असून , या उत्कृष्ट कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×