नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – कल्याण पूर्व चक्कीनाका परिसरातील प्रकाश सायकल मार्टचे मालक भावेश चौधरी यांची संजय आचरे आणि कविता आचरे या पती पत्नीने सायकल विकत घेण्याच्या बहाण्याने दुसऱ्या व्यक्तीचा फेक चेक देऊन फसवणूक केली.
महिलेने आपण विष्णूनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून ,माझ्या गाडीत माझी पर्स राहिली आहे त्यामुळे आता मला डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं आहे तेव्हा मला दहा हजार रुपये द्या नंतर मी संध्याकाळी तुम्हाला परत करते सांगितले आणि नंतर पुन्हा अडीज हजार जीपे ने घेवून फसवणूक करणाऱ्या पती पत्नी ला कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय एपी सुरवडे आणि त्यांच्या टीम ने पुणे कामशेत येथून अटक केली आहे. कामशेत मध्ये राहून ठाणे जिल्हयातील लोकांची फसवणूक करण्याचा त्यांचा हा धंदा असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.