महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी देश

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग याबाबत ज्ञान आदानप्रदान सत्र 

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – सीएसआयआरच्या (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) जमशेदपूरमधल्या राष्ट्रीय धातुकर्म प्रयोगशाळेतील (एनएमएल) वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. सुमन तिवारी यांनी  सीएसआईआर-नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन एंड पॉलिसी रिसर्च (एनआईएससीपीआर- राष्ट्रीय विज्ञान संवाद आणि धोरण संशोधन संस्था) आणि मे. एनसीपीएल यांचा पुढाकार आणि ज्ञान आघाडी व नॉलेज एंड अवेयरनेस मैपिंग प्लेटफॉर्म (केएएमपी) अंतर्गत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या 800 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आदानप्रदान सत्राचे आयोजन केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) ही दोन क्षेत्रे एकमेकांशी खूप संबंधित क्षेत्रे असून अलिकडच्या वर्षांत त्यांचे महत्त्व आणि अनुप्रयोग लक्षणीयरीत्या वाढले असल्याचे डॉ. तिवारी यांनी स्पष्ट केले.  ही क्षेत्रे  मोठी तांत्रिक प्रगती करत आहेत आणि आपल्या जीवनातील विविध पैलूंना आकार देत आहेत. या विशेष सीएसआयआर -एनएमएल आणि केएएमपीच्या कार्यशाळेत आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या क्षेत्रांविषयी जाणून  घेऊ, एआय व एमएलच्या रहस्यांचा शोध घेऊ आणि या प्रभावी तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊ जे आपल्या कामाच्या, जगण्याच्या आणि नवनवीन पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणत आहेत.”

सीएसआयआर- राष्ट्रीय धातुकर्म प्रयोगशाळा (सीएसआयआर -एनएमएल) ही खनिजे, धातू आणि साहित्य- विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक सेवा आणि मनुष्यबळ विकासाच्या विविध पैलूंसाठी समर्पित एक प्रमुख भारतीय संशोधन संस्था आहे. मटेरिअल्स इंजिनिअरिंग, धातू उत्खनन आणि पुनर्वापर, खनिज प्रक्रिया, प्रगत सामग्री  आणि प्रक्रिया, विश्लेषणात्मक आणि उपयोजित रसायनशास्त्र इ. ही सीएसआयआर -एनएमएल,  जमशेदपूर येथील प्रमुख संशोधन क्षेत्रे आहेत.
केएएमपी, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर ) – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च आणि औद्योगिक भागीदार मे. न्यासा कम्युनिकेशन्स प्रा. लि (एनसीपीएल) यांचा एक पुढाकार आणि ज्ञान आघाडी आहे.  विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्षमतांना वाव मिळावा यासाठी सर्जनशीलता, अर्थपूर्ण शिक्षण, वाचन आणि विचार कौशल्ये विकसित करणे, हा यामागचा हेतू आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »