DESK MARATHI NEWS ONLINE.
डोंबिवली/शंकर जाधव -डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील पाच गाळ्यांवर सोमवार 7 तारखेला पलिका प्रशासनाने कारवाई सुरु केली. या कारवाईला गाळेधारकांनी विरोध दर्शविला. मात्र पालिकेचे सहायक आयुक्त संजय कुमावत यांनी सदर कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार होत आल्याचे सांगितले. गाळेधारकांनी या कारवाईला आपला विरोध दर्शविला आहे. तर आम्ही कारवाई तेव्हाच करून देऊ जेव्हा आम्हाला न्यायालयाच्याआदेशाची प्रत दाखवाल अशी मागणी यावेळी गाळेधारकांनी पालिकेकडे केली आहे.
डोंबिवली पूर्वकडील मानपाडा रोडवरील गेली साठ वर्षापासून पाच गाळे आहेत. तर बाजूकडील रिलक्स बार अँड रिस्टोरेंटच्या मालकाने स्वतः हुन आपले दुकान तोडण्यास सुरुवात केली.मात्र बाजूकडील पाच दुकानांवर सोमवार जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी येथील गाळेधारकांनी आम्हाला कारवाईच्या आदेशाची प्रत दाखवा,तरच कारवाई कारवाई करून देऊ अशी भूमिका घेतली.
याबाबत गाळेधारक म्हणाले, ही कारवाई अन्यायकारक आहे. आम्ही मतदान केले पण आमच्या मदतीला एकही जण आले नाही. पालिका प्रशासन आम्हाला कारवाईची प्रत का दाखवित नाही. कारवाई विरोध नाही पण आदेश तर दाखवा.तर पालिका उपायुक्त म्हणाले, एका याचिकाकर्त्याच्या याचिकेवर न्यायालयाने डोंबिवलीतील पाच गाळ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार या गळ्यांवर कारवाई झाली आहे.