Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे ताज्या घडामोडी न्युजरूम

केडीएमसी अग्निशमन दलातर्फे आयोजित सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

DESK MARATHI NEWS ONLINE.

कल्याण/प्रतिनिधी – वाढत्या आगीच्या घटना रोखण्यासह त्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी केडीएमसी अग्निशमन दलातर्फे आयोजित सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. आधारवाडी येथील मुख्य अग्निशमन केंद्रापासून संपूर्ण शहरभर ही रॅली काढण्यात आली.

14 ते 21 एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यभरात अग्निशमन दल सप्ताह साजरा करण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून केडीएसमी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी आणि केडीएमसीचे सायकल उपक्रमाचे नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य सायकल रॅली काढण्यात आली. केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव, ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, 4 आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू दिलीप घाडगे यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली.

ज्यामध्ये कल्याण सायकलिस्ट असोसिएशन, कल्याण पूर्व सायकलिस्ट असोसिएशन, डोंबिवली सायकलिस्ट असोसिएशन, पलावा सायकलिस्ट असोसिएशन, हिरकणी सायकल ग्रुप आदी सायकल संघटनांच्या 200 सदस्यांसह अनेक हौशी सायकलपटूही उत्साहाने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये प्रोफेशनल सायकलिस्टसोबतच महिला आणि विद्यार्थी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. एक चिंगारी करू शकते नुकसान भारी, आपातकालीन परिस्थितीत लिफ्टऐवजी जिन्याच्या वापर करा, आपली सुरक्षा आपला अधिकार, इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा सतत कार्यान्वित ठेवा अग्निशमन जनजागृतीपर विविध माहितीपूर्ण फलक या सायकलसमोर लावण्यात आले होते.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी मुख्य अग्निशमन केंद्रापासून सुरू झालेली ही रॅली लालचौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, मुरबाड रोड, बिर्ला कॉलेज, खडकपाडा, आधारवाडी चौक मार्गे पुन्हा अग्निशमन दल मुख्यालयात समाप्त झाली.

दरम्यान यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन विभागाने एक माहिती पुस्तिका तयार केली असून त्यात अग्नीसुरक्षेबाबत सखोल माहिती देण्यात आली आहे. या माहिती पुस्तकांच्या 5 हजार प्रती छापण्यात आल्या असून लवकरच शहरातील रहिवासी सोसायट्या त्याचे वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X