महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

बांधकाम परवानगीची माहिती दर्शनी भागावर लावण्याचे केडीएमसीचे आदेश

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामे उभारण्याचे प्रमाण वाढत आहे. या बेकायदा बांधकामातील घरे नागरीकांना कमी किंमतीत विकून त्यांची फसवणूक केली जाते. केवळ नागरीकांचीच फसवणूक केली जात नाही तर महापालिका प्रशासन, राज्य सरकार आणि रेरा प्राधिकरणाचीही फसवणूक करण्यात येते आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केडीएमसाकडून बांधकाम परवानगी प्राप्त असलेल्या भूखंडाच्या दर्शनी भागावर माहिती फलक लावण्याची सक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेकडून विविध भूखंड विकसीत करण्यासाठी परवानगी दिली जाते. प्रचलित विकास नियंत्रण नियमावलीनुसार अशी बांधकाम परवानगी प्राप्त असलेल्या भूखंडाच्या दर्शनीभागावर माहिती फलक लावण्यास सक्ती करण्यात आली आहे. या माहिती फलकांमुळे नागरीकांना देखील बांधकाम अधिकृततेविषयी सहजरित्या खात्री करता येऊ शकते. येत्या तीन दिवसात माहिती फलक लावण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिले आहेत.

जे विकासक तीन दिवसांच्या आत माहिती फलक लावणार नाहीत. ते बांधकाम अनधिकृत ग्राह्य धरुन प्रभाग अधिकारी कार्यालयाकडून दंड आकारला जाईल. तसेच संबंधित बांधकामाला स्थगिती देण्यात येईल असे आदेश महापालिकेच्या सहाय्यक संचालक नगररचनाकार दिशा सावंत यांना दिले आहेत. नागरीकांकडून बेकायदा बांधकामात घर खरेदी केल्याने त्यांची फसवणूक होत आहे त्याला आळा घालण्यासाठी आयुक्तांनी नवा तोडगा काढून माहिती फलक लावण्याची सक्ती केली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »