DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/प्रतिनिधी – पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत अतिधोकादायक/ धोकादायक इमारती कोसळून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार, ७/ह प्रभागाचे सहा.आयुक्त राजेश सावंत यांनी डोंबिवली (पश्चिम) गणेश नगर येथील रिक्षा स्टॅन्डच्या बाजूच्या तळ+2 मजली पुष्प छाया या अतिधोकादायक इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई आज दिवसभरात केली.
सदर इमारतीमध्ये एका व्यक्तीचा रहिवास असल्याने, संबंधित व्यक्तीस रहिवास मुक्त करुन संबंधित व्यक्तीचे भोगवटा प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. ही इमारत सुमारे ४० वर्षे जुनी असून आज इमारतीचे बांधकाम पूर्णत: जमिनदोस्त करण्यात आले.सदर कारवाई उप अभियंता अजय महाजन, अनधिकृत बांधकाम विभागाचे अधिक्षक अरुण पाटील, फेरीवाला हटाव पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ पोकलेन व ५ मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.