महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

केडीएमसी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

नेशन न्यूज मराठी टिम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीतील कंत्राटी सफाई कामगारांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. केडीएमसी प्रशासनाने लेखी आश्वासन देऊनही वेळेत वेतन न मिळाल्याचा निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. कल्याण डोंबिवलीतील सुमारे 1 हजाराच्या आसपास कंत्राटी कामगारांनी आजपासून सामूहिक सुट्टी टाकली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कल्याण डोंबिवलीत कचरा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

कल्याण डोंबिवलीत खासगी कंत्राटदारांमार्फत शहरातील कचरा उचलण्याचे काम केले जाते. मात्र या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नसल्याच्या मुद्द्यावर मनसेने काही दिवसांपूर्वीच केडीएमसी प्रशासनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी दर महिन्याच्या 10 तारखेला या कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल असे लेखी आश्वासन केडीएमसी घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिल्याची माहिती मनसे कामगार सेनेच्या उल्हास भोईर यांनी दिली. तसेच या कर्मचाऱ्यांचे गेल्या 2-3 महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. गेल्या महिन्यात गणेशोत्सव झाल्यानंतर या कामगारांना वेतन देण्यात आले होते. तर ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्येक 10 तारखेला वेतन दिले जाईल असे लेखी देऊनही आज 11 तारीख आली तरी अद्याप वेतन मिळाली नसल्याची माहिती उल्हास भोईर यांनी दिली आहे.

केडीएमसी उपायुक्त पाटील यांच्या या वागणुकीविरोधात कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुट्टी आंदोलन सुरू केले आहे . जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही तोपर्यंत हे सामूहिक सुट्टी आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचेही भोईर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळल्यास ऐन सणासुदीच्या दिवसांत कल्याण डोंबिवलीत कचऱ्याची समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »