नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – श्रीमंत असो किवा गरीब कांदा हा दैनंदिन जीवनातील प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा घटक. त्यामुळेच कांदा नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतोच. कांदा महागला तरी चर्चेत, कांदा स्वस्त झाला तरी चर्चेत, कांद्यावर निर्यात बंदी लावली तरी चर्चेत, निर्यात बंदी उठवली तरी चर्चेत. कांद्याच्या चर्चा या होताच राहतात पण कांदा पिकविण्यासाठी रक्ताच पाणी करणारा शेतकरी मात्र कधी चर्चेत नसतोच तो असतो नेहमीच अडचणीत. आणि उष्णतेमुळे कांदा खराब होऊ लागल्याने आता कांदा चर्चेत आला आहे, आणि शेतकरी अडचणीत.
कांद्याला भाव मिळेल या आशेने येवल्यातील शेतकरी गायकवाड यांनी एक एकर क्षेत्रामध्ये उन्हाळ कांद्याचे पीक घेतले मात्र ज्यावेळी कांदा विक्रीस आला त्यावेळेस कांदा व्यापारी व माथाडी कामगारांमधील संघर्षामुळे बाजार समिती बंद होत्या. गेल्या महिन्याभर बाजार समिती बंद ,त्यात उन्हाचा तडाका यामुळे साठवलेला कांदा हा खराब झाला असल्याने आता केलेला खर्च देखील निघणे या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मुश्किल झाले आहे. तरी कांदा व्यापारी व माथाडी कामगार संघर्ष व वाढती उष्णता यामुळे साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब असल्याने परत एकदा बळीराजा संकटात सापडलाय.
आणि आता या संकटाची चर्चा करून मायबाप सरकारने चर्चा न करता शेतकऱ्याची अडचण कशी दूर करता येईल या कडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अशी आशा शेतकरी करत आहे.



