नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबई पोलिसांनी एका अशा डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. तो मुंबई उपनगरात बाइक चोरी करत होता. मुंबई उपनगरत फिरून घाईघाईत गाडीला चावी ठेवून गेलेल्या चालकांच्या दुचाकी चोरी करीत असे. मंगेश रामचंद्र गुप्ता असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल १२ चोरलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी घाटकोपर पूर्व मधून एक दुचाकी होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी यातील आरोपीचा शोध सुरु केला असता त्यांना मंगेश गुप्ता हा कळवा येथे रहाणाऱ्या डिलिव्हरी बॉयने ही दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला कळवा येथून अटक केली. त्याचा कसून तपास केला असता त्याने घाटकोपर मधून एक, मुलुंड मधून दोन, भांडुप मधून एक, पवई मधून तीन, दादर येथून एक, शिवाजी पार्क येथून एक, नौपाडा येथून एक आणि राबोडी येथून एक अशा चार महिन्यात बारा दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
या दुचाकी त्याने घरापासून काही अंतरावर नेवून ठेवल्या होत्या. काही दिवसांत तो या दुचाकींच्या नंबर प्लेट काढून विकण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी त्या आधीचं त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने आणखी अशा किती दुचाकी चोरल्या आहेत? याचा पोलीस शोध घेत असून वाहन चालकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



