महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी व्हिडिओ

कल्याण पोलिस ब्रेक दि चेन साठी सज्ज, रिक्षा चालक, बस चालकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक

कल्याण प्रतिनिधी- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारच्या वतीने अनेक निर्बंध लागू करण्यात आले असून यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा भाग असलेल्या रिक्षा चालक, एसटी बस चालक, वाहक आणि इतर व्यवसायिक वाहन चालकांना आपली आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असणार असून कोविड निगेटिव्ह रिपोर्ट असणे गरजेचे आहे. याबाबत आज कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, महात्मा फुले पोलीस स्टेशनचे व.पो.नि. नारायण बानकर आणि इतर पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालक, नागरिक, बस चालक वाहक, प्रवासी यांच्यात जनजागृती केली.

       रिक्षामध्ये केवळ दोन प्रवासी, एसटी आणि टॅक्सीमध्ये प्रवासी क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांना परवानगी असणार आहे. रिक्षाचालकांना आपली  आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असणार असून १० एप्रिल पर्यंत हि टेस्ट करायची आहे. तर ४५ वर्षावरील चालकांना येत्या १५ दिवसाच्या आत आपले लसीकरण करून तो रिपोर्ट देखील सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे. प्रवासी आणि रिक्षा चालक यांनी देखील मास्क वापरणे गरजेचे आहे. एसटी बस मध्ये केवळ बसण्याची आसनक्षमता आहे तेवढ्याच प्रवाशांची वाहतूक करता येणार असून एसटी बस चालक आणि वाहक यांना देखील आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »