DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/प्रतिनिधी – तीन वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये एकत्र राहणाऱ्या प्रियकराने प्रियसीची हत्या केल्याची घटना ठाकुर्लीतील सर्वोदय स्नेह बिल्डींगमध्ये मंगळवार 29 तारखेला घडली होती.प्रियकर हत्या करून पसार झाला होता. टिळकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.कल्याण क्राईम ब्रांच या गुन्हातील प्रियकराचा शोध घेत होते. पोलिसांनी प्रियकराला अटक करुन जेरबंद केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष श्रीधर भोईर ( ४२ वर्ष, रा. रू.नं. २०२, सर्वोदय स्नेह बिल्डींग, ठाकुर्ली ) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. तो आणि एक तरुणी तीन वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत होते. दोघात वाद झाला होता. आधी तरुणीने प्रियकराचा ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला.मात्र ती अपयशी झाली.प्रियकराने त्याच ओढणीने प्रियसीचा गळा आवळल्याने तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी आधी आकस्मिक निधनाचा गुन्हा दाखल केला हाेता.
यानंतर पोलिस तपास करीत होते. याच दरम्यान कल्याणक्राईम ब्रांच पोलिसांना माहिती मिळाली की तरुणीची हत्या करणारा प्रियकर पळून जाण्याच्या तयारीत होता.पोउपनि किरण भिसे व पोलीस पथक यांनी दुर्गाडी ब्रिजचे खाली, गणेशघाट कल्याण पश्चिम येथे सापळा रचुन प्रियकराला बुधवार ३० तारखेला पकडले. त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याला टिळकनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी यशस्वी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त ( गुन्हे )अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त (शोध ) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, पोलीस उप निरीक्षक किरण भिसे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, पोहवा विलास कडु, पोहवा सुधिर कदम, पोहवा विजय जिरे, पोहवा सचिन भालेराव, पोना प्रविण किणरे, पोशि ७६३७मिथुन राठोड, पोशि विजेंद्र नवसारे यांनी बजावली.