महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात अवैध बिअरसह मुद्देमाल जप्त

मुंबई /प्रतिनिधी – नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात अवैध बिअरसह मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.मौजे वाडी गावाचे हद्दीतील पुनर्वसन कोरड्या पोसली नदीच्या पात्रात, ता. शहादा (जि. नंदूरबार) या ठिकाणी दारुबंदी कायद्यांतर्गत छापा टाकून केलेल्या गुन्हा अन्वेषण कारवाईमध्ये मध्य प्रदेश राज्यात निर्मिती केलेल्या व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या बिअरचे एकूण ४५० बॉक्स व एक भ्रमणध्वनी संच तसेच ०३ मालवाहक वाहने असा एकूण रुपये ३५,५५,०००/- इतक्या किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. या प्रकरणी अवैध बिअर साठा खरेदीदार आरोपीत मगन दखन्या वसावे, वय ३५ वर्ष रा. मु. पो. जिवन नगर, वाडीपूर, कुडावत जावदा, ता. शहादा (जि. नंदूरबार) यास अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर आहे.

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई या भरारी पथकाने २८.११.२०२१ रोजी मिळालेल्या माहितीनुसार मौजे वाडी गावाचे हद्दीतील पुर्नवसन कोरड्या पोसली नदीच्या पात्रात, ता. शहादा (जि. नंदुरबार) या ठिकाणी छापा टाकला. पहाटेच्या सुमारास एका चॉकलेटी रंगाच्या आयशर कंपनीच्या ट्रक क्र. MH-I8-AA-0204 मधून फक्त मध्य प्रदेश राज्यातच विक्रीकरिता निर्मिती केलेल्या परंतु, महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता प्रतिबंधित असलेल्या अवैध बिअर साठ्याची विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या आयात केली जाणार असून तो साठा दुसऱ्या एका आशयर कंपनीच्या डंपर क्र. GJ-34-T-1317 व एका महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप क्र. MH-04-HD-5710 या दोन वाहनांमधून महाराष्ट्र राज्यातील विविध भागात वितरित केला जाणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती.

याच पथकामार्फत नोंदविलेल्या गुन्हा रजि. क्र. ३८१/२०२९ दि. १३.११.२०२१ नुसार मौजे मामाचे मोहिदा शिवारातील, नवीन तहसिल कार्यालयाच्या समोरील रोडवर, ता. शहादा (जि. नंदूरबार) या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये ०२ आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेले व मध्यप्रदेश निर्मित अवैध बिअरचे ५२० बॉक्ससह एक टेम्पो असा एकूण रु. २९,४५,६००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एकाच महिन्यात शहादा, नंदूरबार येथे केलेल्या सलग दोन कारवायांमध्ये एकूण ०३ आरोपींच्या ताब्यातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या व मध्य प्रदेश राज्यात विक्रीकरिता निर्मिती केलेल्या अवैध बिअरचे ९७० बॉक्स जप्त करण्यात आले असून एकूण ०४ वाहनांसह रु.५७,००,६००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या दोन्ही कारवाया श्री. कांतिलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशानुसार व श्री. सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त, कोकण विभाग, ठाणे व श्रीमती उषा वर्मा, संचालक (अ.ब.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदूरबार व त्यांचे कर्मचारी यांचे कारवाईवेळी सहकार्य लाभले.

या गुन्ह्याची फिर्याद श्री. विशाल बस्ताव, जवान बक्कल क्र. २६४ यांनी दिली असून पुढील तपास श्री. मनोज चव्हाण, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक मुंबई हे करत आहेत.

अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्रि क्रमांक १८०० ८३३ ३३३३ व व्हॉटस अॅप क्र. ८४२२००९१३३ तसेच दूरध्वनी क्र. ०२२-२२६३८८१ वर संपर्क साधावा, असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »