महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
देश न्युजरूम

आयओएस सागर मॉरिशसच्या पोर्ट लुईस येथे दाखल

DESK MARATHI NEWS.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – दक्षिण पश्चिम हिंद महासागरात तैनातीचा एक भाग म्हणून मॉरिशसच्या राष्ट्रीय तटरक्षक दलासोबत (NCG) संयुक्त ईईझेड टेहळणीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आयओएस सागर 26 एप्रिल 25 रोजी मॉरिशसमधील पोर्ट लुईस हार्बर येथे दाखल झाली. ही भेट म्हणजे भारताच्या प्रादेशिक सागरी सहकार्य आणि मित्रत्वाचे नाते असलेल्या परदेशी देशांसोबत क्षमता बांधणीच्या वचनबद्धतेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

5 एप्रिल 25 रोजी कारवार येथून निघालेल्या भारतीय नौदल जहाज सुनयना (IOS SAGAR) मध्ये हिंद महासागर क्षेत्रातील (IOR) मित्रत्वाचे नाते असलेल्या नऊ परदेशी देशांमधील 44 नौदल कर्मचारी आहेत, ज्यामध्ये मॉरिशस प्रजासत्ताकातील दोन अधिकारी आणि सहा खलाशी यांचा समावेश आहे.

हा उपक्रम सामूहिक वृद्धी आणि सहकार्याच्या भावनेने आंतरकार्यक्षमता, परस्पर प्रशिक्षण आणि प्रादेशिक सागरी सुरक्षा वाढवण्याच्या हेतूने  भारतीय नौदल करत असलेले  सातत्यपूर्ण प्रयत्न अधोरेखित करतो.

भारत आणि मॉरिशसमधील निकटचे आणि कालबद्ध बंध प्रतिबिंबित करत जहाज आणि तिच्यावरील कर्मचाऱ्यांचे अत्यंत जिव्हाळ्याने आणि उत्साहाने स्वागत करण्यात आले. स्वागत समारंभात सुरूजेबल्ली आर, पीएमएसएम, पोलिस आयुक्त तसेच पंतप्रधान कार्यालय,  मॉरिशस पोलिस दल, भारतीय उच्चायोग आणि एनसीजी मॉरिशसमधील अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. स्वागत समारंभ पूर्ण झाल्यानंतर, उपस्थित मान्यवरांना  जहाजाची सफर घडवण्यात आली, ज्यानंतर मित्रत्वाचे नाते असलेल्या परदेशी देशांमधून आलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

बंदर भेटी दरम्यान, सागर भारतीय सागरी सेवेतील कमांडिंग ऑफिसर, राष्ट्रीय तटरक्षक दलाचे कमांडंट, पोलिस आयुक्त आणि भारताचे उच्चायुक्त यांची भेट घेतील. दोन दिवसांच्या बंदर भेटी दरम्यान विविध उपक्रमांचे नियोजन आहे, ज्यामध्ये आय ओ एस सागर वरील खलाशांनी मेरीटाईम एअर स्क्वॉड्रन, स्पेशल मोबाईल फोर्स स्क्वॉड्रन आणि पोलिस हेलिकॉप्टर स्क्वॉड्रनला भेट देणे याचा समावेश आहे. पोलिस आयुक्त पोलिस मुख्यालयात आय ओ एस सागर मधील बहुराष्ट्रीय कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधतील. 27 एप्रिल 25 रोजी हे जहाज अभ्यागतांसाठी खुले असेल. पोर्ट लुईस येथील जहाजाच्या मुक्कामादरम्यान ट्रेकिंग, संयुक्त योग सत्र आणि मैत्रीपूर्ण क्रीडा स्पर्धा यासारख्या उपक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे.

प्रस्थानानंतर, जहाज मॉरिशसच्या राष्ट्रीय किनारपट्टी सुरक्षेसह संयुक्त ईईझेड टेहळणीचा  दुसरा टप्पा पार करेल आणि तो पूर्ण झाल्यानंतर सेशेल्समधील पोर्ट व्हिक्टोरिया येथे रवाना होईल.

अत्याधुनिक सरयू वर्ग असलेल्या नौदल किनारपट्टी गस्ती जहाज आय एन एस सुनयनाची बांधणी चाचेगिरीविरोधी कार्यवाही, सागरी टेहळणी आणि मानवी सहाय्य आणि आपत्ती प्रतिसादाच्या दृष्टीकोनातून करण्यात आली आहे. हे जहाज मध्यम आणि निकट  पल्ल्याच्या तोफखाना शस्त्रे आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्ध सामग्रीने सुसज्ज आहे, ज्यामध्ये क्षेपणास्त्र संरक्षण उपायांचा समावेश आहे. यातून हेलिकॉप्टर देखील वाहून नेले जाऊ शकतात, ज्यामुळे त्याची क्रियान्वयन आणि टेहळणी क्षमता वृद्धिंगत होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×