महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

त्र्यंबकेश्वर येथे होणार आंतरराष्ट्रीय योग दिवस,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राहणार उपस्थित

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 जून रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आठवा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्र्यंबकेश्वर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी आयोजित बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी  गंगाथरन डी., मुंबईचे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक रणदीप दत्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल,  उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, गणेश मिसाळ, निलेश श्रींगी, वासंती माळी, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एन. गांगुर्डे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, अर्चना पठारे, संदिप आहेर यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख व नोडल अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील 75 ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमांचे एकाच वेळी थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.  त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कार्यक्रमास्थळी संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेवून त्या दृष्टिने योग्य त्या उपाययोजना करून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे. तसेच केंद्रीय राजशिष्टाचारानुसार सर्व बाबींचे नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहतुक कोंडी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी अखंडीत वीज पुरवठा, वेगवान इंटरनेटची सुविधा अबाधित ठेवण्यात यावी, अशा सूचनाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »