महत्वाच्या बातम्या

मागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्तलाखोंचा गुटखा जप्त मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरारटँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची मैलभर पायपीटफेक आंतरराष्ट्रीय फोन कॉल ब्लॉक करण्यासाठी सरकारने दिले निर्देशवीज कंत्राटी कामगार संघांचे ‘सरकार जगाव’ अभियान
तंत्रज्ञान ताज्या घडामोडी

भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू WAVES 2025 मध्ये एकाच व्यासपीठावर

मुंबई/प्रतिनिधी – 19 जानेवारी 2019 रोजी मुंबईतील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रेरणादायी स्वप्न मांडले ते म्हणजे आपण एका परिषदेपासून सुरुवात करू आणि तिला डाव्होसच्या धर्तीवर  जागतिक परिषद बनवू. या दृष्टिकोनाला साकार करणारा एक भव्य उपक्रम म्हणजे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025.

भारताची सांस्कृतिक आणि मनोरंजनाची राजधानीमुंबई,   1 ते 4 मे 2025 दरम्यान या अभूतपूर्व जागतिक सोहळ्याचे यजमानपद भूषवणार आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांच्या सहकार्याने हा सोहळा  मुंबईत आयोजित केला आहे. WAVES 2025 हे भारताला जागतिक कंटेंट हब म्हणून स्थापित करण्याचे एक क्रांतिकारी पाऊल आहेजिथे सर्जनशीलतानवप्रवर्तन आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा एकत्र येणार आहे.   जगात प्रथमच भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.”

कनेक्टिंग क्रिएटर्सकनेक्टिंग कंट्रीज या ब्रिदवाक्यासह, WAVES 2025 ही भारतातील पहिली जागतिक मीडिया आणि मनोरंजन परिषद आहेजी मुंबईच्या बांद्रा कुर्ला संकुलातील  जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजनासाठी  सज्ज  झाले आहे. हा चार दिवसांचा महोत्सव भारताच्या 54 अब्ज अमेरिकी डॉलरच्या (2026 पर्यंत) मीडिया आणि मनोरंजन बाजारपेठेला नव्या उंचीवर नेण्यासाठी आकारला गेला आहे. या परिषदेत भारताच्या कथाकथन परंपरेला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अॅनिमेशन, VFX, गेमिंग, AR/VR/XR, कॉमिक्सचित्रपटमाहितीपटसोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म आणि प्रसारण यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांशी जोडले जातील. ही परिषद केवळ एक इव्हेंट नाहीतर सर्जनशीलतेचा महासागर आणि नवप्रवर्तनाची लाट आहेजी भारताला जागतिक सर्जनशील केंद्र बनवण्यासाठी सज्ज झाले आहे. 

WAVES 2025 मध्ये 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, 40 जागतिक मंत्री आणि नेटफ्लिक्सगुगलअॅमेझॉन प्राइम व्हिडिओसोनी पिक्चर्सअॅडोबएपिक गेम्स यासारख्या दिग्गज कंपन्या सहभागी होतील. जागतिक बॉलिवूडचे वरिष्ठ  कलाकार शाहरुख खानरजनीकांतअक्षय कुमारचिरंजीवीआमिर खानदीपिका पादुकोणरणबीर कपूर आणि दिलजीत दोसांज यांच्या सल्लागार मंडळाने या परिषदेला पाठिंबा दिला आहे. नेटफ्लिक्सचे टेड सरांडोसअॅमेझॉनचे माइक हॉपकिन्स आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती WAVES परिषदेला जागतिक स्तरावर ओळख देईल. या परिषदेचा मुख्य उद्देश भारताच्या मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणेआंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे आणि नवप्रवर्तनाला गती देणे आहे. भारत आणि इतर देशांमधील सर्जनशील उद्योगांमधील भागीदारी वाढवणे, AI आणि गेमिंगसारख्या तंत्रज्ञानांचा वापर करून उद्योगाला नवे आयाम देणे आणि 2027 पर्यंत 36.1 अब्ज डॉलरची सर्जनशील अर्थव्यवस्था उभारणे हा या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. यामुळे 2–3 लाख रोजगार निर्माणही होतीलसोबतच महिला-नेतृत्वातील स्टार्टअप्स आणि 12–19 वयोगटातील क्रिएटर्सना प्राधान्य देऊन त्यांचा  समावेशकता वाढेल.

 WAVES 2025 या बहुप्रतीक्षित महोत्सवाचा प्रारंभ परिषदेच्या पहिल्या दिवशी मे 2025 रोजी भव्य उद्घाटन समारंभाने होणार असूनया सोहळ्याचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. या वेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारउद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत. ग्लोबल मीडिया डायलॉग्समध्ये मंत्र्यांसह धोरणेगुंतवणूक आणि सहकार्यासाठी चर्चा होतील . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत PM-CEO राउंडटेबल आयोजित  होतीलज्यामध्ये उद्योगांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण संवाद होतील. भारत पॅव्हिलियनच्या लाँचद्वारे नाट्यशास्त्रापासून AI-चालित कथांपर्यंतचा भारताचा कथाकथन वारसा प्रदर्शित होईल. एक्झिबिशन आणि गेमिंग अरेनामध्ये AI, AR/VR/XR, VFX मधील नवकल्पना दिसतील. WAVES बाजार क्रिएटर्सस्टुडिओ आणि खरेदीदारांसाठी नेटवर्किंगची संधी या आतंरराष्ट्रीय व्यासपीठावर  एक छताखाली उपलब्ध होतीलतर शास्त्रीय आणि फ्यूजन कॉन्सर्ट्ससह सांस्कृतिक कार्यक्रम या दिवसाला अविस्मरणीय बनवतील.   

दुसऱ्या दिवशी, 2 मे 2025 रोजीक्रिएटोस्फीअरमध्ये क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा थेट अंतिम सोहळा होईलज्यामध्ये 32 स्पर्धांमधील 750 फायनलिस्ट सहभागी होतील. यामध्ये फिल्म पोस्टर मेकिंगयंग फिल्ममेकर्सबॅटल ऑफ द बँड्स यासारख्या स्पर्धांचा समावेश असेल. नेटफ्लिक्स आणि सोनी पिक्चर्स यांचे मास्टरक्लासेस सर्जनशीलतेला प्रेरणा देतील. WAVES क्रिएटर अवॉर्ड्समध्ये अॅनिमेशनगेमिंग आणि AI मधील विजेत्यांचा गौरव करण्यात येईल. वेव्हएक्सलरेटर स्टार्टअप्ससाठी पिचिंग आणि मार्गदर्शनाची संधी उपलब्ध होईलतर थॉट लीडर्स ट्रॅकमध्ये जेनरेटिव्ह AI आणि इमर्सिव्ह स्टोरीटेलिंगवर चर्चा होईल. WAVES बाजारात सह-निर्मिती आणि कंटेंट खरेदीसाठी B2B बैठका होतीलज्या क्रिएटर्स आणि उद्योग दिग्गजांना एकत्र आणतील. 

तिसऱ्या दिवशी, 3 मे 2025 रोजीग्लोबल मीडिय डायलॉग्स WAVES डिक्लरेशन 2025 च्या समारोपासह चर्चा करतील. वेव्हएक्सलरेटर गेमिंग, AI आणि मेटाव्हर्स स्टार्टअप्ससाठी पिचिंग आणि गुंतवणूक आणेल. क्रिएटोस्फीअरमध्ये XR हॅकाथॉन, AI अवतार चॅलेंज आणि अॅनिमेशन स्पर्धा झोन उपलब्ध असेल. प्रदर्शनात  भारतीय IPs आणि AR/VR/XR तंत्रज्ञान प्रदर्शित होतील. WAVES बाजार जागतिक निर्माते आणि प्रसारकांमधील जुळवणी सुलभ करेलज्यामुळे सह-निर्मिती आणि IP खरेदीला चालना मिळेल. 

चौथ्या आणि अंतिम दिवशी, 4 मे 2025 रोजीसमारोप समारंभात WAVES च्या प्रभावाचा आढावा घेतला जाईल आणि भविष्य आवृत्त्यांची घोषणा होईल. क्रिएटोस्फीअरमध्ये क्रिएट इन इंडिया चॅलेंज विजेत्यांचे प्रदर्शन आणि WAVES अवॉर्ड्स आयोजित केले गेले आहे. वेव्हएक्सलरेटर स्टार्टअप इंडिया अंतर्गत अनुदानाच्या घोषणा होतीलतर भारत पॅव्हिलियन भारताच्या 50 अब्ज+ अमेरिकी डॉलर M&E क्षमतेचा उत्सव साजरा करेल. हा दिवस WAVES च्या यशाचा  मैलाचा दगड ठरेल आणि भारताच्या सर्जनशील भविष्याची दिशा ठरवेल. 

WAVES 2025 परिषदेची ची विशेष वैशिष्ट्ये भारत पॅव्हिलियनपासून सुरू झालीजे बॉलीवूडप्रादेशिक सिनेमा, OTT आणि गेमिंगमधील नवकल्पना दाखवेल. WAVES बाजार हे कंटेंट क्रिएटर्सखरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी जागतिक ई-मार्केटप्लेस असेलजिथे सह-निर्मिती आणि IP खरेदी सुलभ होईल. वेव्हएक्सलरेटर गेम स्टुडिओ आणि लॅपविंग स्टुडिओ यासारख्या स्टार्टअप्सना पिचिंगइनक्यूबेशन आणि अनुदानाद्वारे सक्षम करेल. क्रिएटोस्फीअर 100देशांमधील 750 फायनलिस्टसह क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा अंतिम सोहळा साजरा करेलतर ग्लोबल मीडिय डायलॉग्स आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी व्यासपीठ  प्रदान करेल. 

क्रिएट इन इंडिया चॅलेंज (CIC) सिझन 1 ही WAVES ची आत्मा आहे. 32 स्पर्धांमधील प्रतिभांना प्रोत्साहन देणारी ही चळवळ 1 लाख नोंदणी आणि 100देशांमधील 1,100 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह जागतिक स्तरावर गाजत आहे. फिल्म पोस्टर मेकिंगयंग फिल्ममेकर्स, WAVES VFX, गेम जेम्स, XR हॅकाथॉनबॅटल ऑफ द बँड्स आणि मंगा कॉन्टेस्ट यासारख्या स्पर्धांमधून सर्जनशीलतेला  जागतिक ओळखपुरस्कार आणि नेटवर्किंगच्या  सुवर्ण संधी उपलब्ध होतील. 

WAVES 2025 ही केवळ एक परिषद नाहीतर भारताच्या सांस्कृतिक आणि तांत्रिक क्षमतेचा जागतिक महोत्सव आहे. डाव्होस आणि कान्स यांसारख्या परिषदांप्रमाणे, WAVES जागतिक सर्जनशील उद्योगासाठी एक सर्वोत्तम व्यासपीठ बनेल. यामुळे भारताला सर्जनशील उद्योगाचे जागतिक केंद्र बनवताना IP संरक्षण, 2–3 लाख रोजगार आणि जागतिक व्यापार सुनिश्चित  होऊ शकेल. या ऐतिहासिक WAVES 2025 च्या जागतिक परिषदेत  सामील व्हा आणि जागतिक सर्जनशीलतेच्या क्रांतीचे साक्षीदार व्हा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×