महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
बिझनेस लोकप्रिय बातम्या

भारतीय रेल्वेने ऑक्टोबर २०२३ पर्यंत ८८७.२४ मेट्रिक टन मालवाहतुकीचा गाठला टप्पा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या काळातील एकत्रित आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेने गेल्या वर्षीच्या 855.64 मेट्रिक टन मालवाहतुकीच्या तुलनेत 887.25 मेट्रिक टन मालवाहतुकीचा टप्पा गाठला आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीमधील मालवाहतुकीच्या तुलनेत अंदाजे 31.61 मेट्रिक टन इतकी जास्त आहे.

भारतीय रेल्वेने यंदा 95929.30 कोटी रुपयांचा महसूल मिळवला असून, गेल्या वर्षीच्या 92345.27 कोटी रुपयांच्या तुलनेत यामध्ये सुमारे 3584.03 कोटी रुपयांची वृद्धी झाली आहे.

ऑक्‍टोबर 2023 मध्ये भारतीय रेल्वेने सुरुवातीच्या स्थानकापासून केलेली मालवाहतूक 129.03 मेट्रिक टन इतकी होती. ऑक्‍टोबर 2022 मध्ये ती 118.95 मेट्रिक टन इतकी होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या मालवाहतुकीच्या तुलनेत यामध्ये अंदाजे 8.47% वाढ नोंदवली गेली आहे.

मालवाहतुकी द्वारे जमा झालेला महसूल ऑक्टोबर 2022 मध्ये 13353.81 कोटी इतका होता.  ऑक्टोबर 2023 मध्ये त्याने 14231.05 कोटी रुपयाचा टप्पा गाठला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 6.57% इतकी वृद्धी नोंदवली गेली आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये भारतीय रेल्वेने मेट्रिक टन कोळसा, 14.81 मेट्रिक टन लोह खनिज, 5.74 मेट्रिक टन पिग आयर्न आणि फिनिश्ड स्टील, 6.32 मेट्रिक टन सिमेंट (क्लिंकर वगळता), 3.62 मेट्रिक टन अन्नधान्य, 5.72 मेट्रिक टन खते, 4.35 मेट्रिक टन खनिजे, 7.15 मेट्रिक टन कंटेनर, आणि 8.55 मेट्रिक टन इतर वस्तूंच्या स्वरूपातील मालवाहतूक केली.

“हंग्री फॉर कार्गो” या मंत्राला अनुसरून, भारतीय रेल्वेने व्यवसाय सुलभतेसाठी  तसेच स्पर्धात्मक किमतीला सेवा वितरणामध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्त्याने प्रयत्न केले आहेत. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि जलद धोरण निर्मितीच्या सहाय्याने व्यवसाय विकास केंद्रांनी केलेल्या कामामुळे  रेल्वेला हे मोठे यश मिळवण्यामध्ये सहाय्य झाले.  

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »