महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी देश

भारतीय नौदलाची चौथ्या सागर परिक्रमेची वेगवान तयारी

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – भारतीय नौदलाने गोवा इथे चौथ्या सागर परिक्रमा IV च्या तयारीची औपचारिक सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, या मोहीमसाठी स्वतःहून पुढे आलेल्या लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रूपा या दोन महिला नौदल अधिकाऱ्यांना मार्गदर्शक आणि प्रशिक्षक  बनवण्यासाठी,  सागरी विश्व परिक्रमा पूर्ण करणारे गोल्डन ग्लोब रेसचे नायक कमांडर अभिलाष टॉमी(सेवानिवृत्त) यांच्यासोबत सागरी नौकानयन केंद्राने करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार अभिलाष टॉमी पुढच्या वर्षी भारतीय नौदलाचे नौकानयन जहाज तारिणीवर प्रशिक्षण देऊन, परिक्रमा मोहीमेवर जाणारा चमू तयार करतील.

कर्मचारी सेवा नियंत्रक आणि भारतीय नौदल नौकानयन संस्थेचे उपाध्यक्ष व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि नौदल युद्ध महाविद्यालयालयाचे कमांडंट रिअर ऍडमिरल राजेश धनखड यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कार्यक्रमाला नौदलातील जवानांची मोठी उपस्थिती होती.

नौदलातील दोन महिला अधिकाऱ्यांच्या प्रभावी सागरी नौकानयन कामगिरीबद्दल व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन, यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि सागर परिक्रमा IV च्या तयारीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. सागरी नौकानयनाच्या प्रयत्नांना सातत्याने पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी भारतीय नौदलाच्या वतीने कमांडर अभिलाष टॉमी यांचे आभार मानले.

येत्या काही महिन्यांत,या दोन्ही अधिकारी कमांडर अभिलाष टॉमी यांच्या प्रशिक्षणाखालील आव्हानात्मक मोहिमेसाठी कठोर प्रशिक्षण घेतील, या प्रशिक्षणामध्ये अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागरात अनेक लहान मोठ्या नौकानयन प्रवासाचा समावेश असेल. कमांडर टॉमी नौकानयन मोहिमेतील इतर सहभागींना मार्गदर्शन करतील आणि प्रशिक्षण आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थींशी प्रेरणादायी चर्चा करून त्यांचे अनुभव सामायिक करतील.

‘सागर परिक्रमा IV’ हा यापूर्वी कधीही न केलेला  उपक्रम असेल आणि भारताच्या सागरी नौकानयन उपक्रमाती एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »