महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी देश

रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सुसज्ज

 

नवी दिल्ली/प्रतिनिधी – रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल दक्ष असून त्वरित आणि प्रभावी सहाय्य करण्याच्या दृष्टीने संभाव्य परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. रेमल चक्रीवादळाच्या संभाव्य परिणामांना तोंड देण्यासाठी भारतीय नौदल प्रमाणित कार्यप्रणालीचा अवलंब करून त्वरित विश्वासार्ह मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण प्रतिसादासाठीच्या प्रारंभिक कृतीसाठी सुसज्ज आहे. 26 आणि 27 मे 2024 च्या मध्यरात्री चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. नौदल मुख्यालयाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून पूर्व नौदल कमांड मुख्यालयाकडून समावेशक प्रारंभिक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

रेमल चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून त्याच्या परिणाम स्वरूप सागर बेट, पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशाच्या खेपूपारा किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाने बाधित लोकसंख्येच्या सुरक्षा आणि कल्याणाच्या हेतूने मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण प्रतिसादासह त्वरित वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा करता यावा या दृष्टीने दोन नौका सज्ज ठेवल्या आहेत. याव्यतिरिक्त, भारतीय नौदलाची महत्वपूर्ण सी किंग आणि चेतक हेलिकॉप्टर्ससह गार्नियर विमानेही, त्वरित प्रतिसादासाठी सज्ज ठेवली आहेत.

त्वरित मदतीसाठी कोलकात्यात विशेष पाणबुडी पथके आवश्यक उपकरणांसह सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास त्वरित प्रतिसादासाठी विशाखापट्टणम इथेही काही पाणबुडी पथके सज्ज आहेत. दोन पूर निवारण सहाय्य्यता पथके (FRTs) मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण प्रतिसादासाठी वैद्यकीय सामग्रीसह कोलकात्यात सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त विशाखापट्टणम आणि चिल्का येथील दोन पूर निवारण सहाय्य्यता पथके त्वरित प्रतिसादासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

 

Related Posts
Translate »