महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश महत्वाच्या बातम्या

भारतीय मुलींनी युरोपियन ऑलिम्पियाडमध्ये रचला इतिहास

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – मुलींनी गणित विषयात संशोधन करावे यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या युरोपीय महिला गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताला रौप्य आणि कांस्य पदक मिळवण्यात यश मिळाले आहे. जॉर्जियात स्काल्तुबो येथे आयोजित मुलींसाठीच्या 13व्या युरोपियन गणित ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारतीय संघाने प्रशंसनीय कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे. भारताच्या चार सदस्यीय संघाने 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली आहे. भारतीय संघाने मिळवलेले हे यश साजरे करण्यासाठी एचबीसीएसईच्या मुख्य इमारतीत आज सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

चेन्नई मॅथेमॅटीकल इन्स्टीटयूटचे साहिल म्हसकर (प्रमुख), अदिती मुथखोड (उपप्रमुख) आणि अनन्या रानडे (निरीक्षक) यांनी भारतीय पथकाचे नेतृत्व केले असून त्यांचे मार्गदर्शन आणि मदत भारतीय पथकाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. वर्ष 2015 मध्ये भारतीय संघाने ईजीएमओ मध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता, त्यानंतर या स्पर्धेत उतरलेल्या सर्वच्या सर्व चारही स्पर्धकांनी पदके मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे.

गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र तसेच कनिष्ठ विज्ञान या विषयांतील ऑलिम्पियाड कार्यक्रमांसाठी भारतातील नोडल संस्था म्हणून काम करणाऱ्या टीआयएफआर-होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने (एचबीसीएसई) या यशाचे श्रेय या आधीच्या स्पर्धांतील पदक विजेत्या खेळाडूंचे समर्पित प्रयत्न, तसेच एचबीसीएसई तर्फे ईजीएमओ प्रशिक्षण शिबिराच्या (ईजीएमओटीसी) माध्यमातून स्पर्धकांना देण्यात आलेले संरचित प्रशिक्षण आणि ऑलिम्पियाड कार्यक्रमाच्या कालावधीत केंद्रीय अणुउर्जा विभागाच्या (डीएई) अखत्यारीतील राष्ट्रीय उच्चस्तरीय गणित मंडळातर्फे देण्यात आलेला सातत्यपूर्ण पाठींबा या सर्व घटकांना दिले आहे.

केंद्रीय अणुउर्जा विभागाच्या (डीएई) अखत्यारीतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने (एचबीसीएसई)-टीआयएफआर ही प्रमुख संस्था भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र तसेच गणित या विषयांतील प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड कार्यक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या प्रतिभावंत स्पर्धकांची निवड करुन,योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना या स्पर्धांसाठी तयार करण्यासाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करते. त्यासाठी भारत सरकारतर्फे मान्यताप्राप्त आणि सरकारच्या पाठबळाने एचबीसीएसई अत्यंत काळजीपूर्वक राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षा आयोजित करते. ही परीक्षा म्हणजे स्पर्धकांना विविध टप्प्यांतून प्रगती करत अंतिम संघात प्रतिष्ठित स्थान निश्चित करण्यासाठीचा मार्ग आहे.

Related Posts
Translate »