महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी देश

भारतीय हवाई दलाची बियॉन्ड व्हिज्युअल रेंज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – भारतीय हवाई दलाच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमान (LCA) LSP-7 तेजसने गोवा किनारपट्टी जवळच्या समुद्रात स्वदेशी बनावटीच्या अस्त्र  बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (BVR) या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले. सुमारे 20,000 फूट उंचीवर या विमानातून क्षेपणास्त्र सोडण्यात यश मिळाले. या चाचणीची सर्व उद्दिष्टे पूर्ण करणारे हे एक परिपूर्ण  उदाहरण ठरेल.

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) चे चाचणी संचालक आणि शास्त्रज्ञ, यांच्यासह सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्थिनेस अँड सर्टिफिकेशन (CEMILAC) आणि हवाई गुणवत्ता हमी महासंचालक (DG-AQA) यांनी या चाचणी प्रक्षेपणाचे परीक्षण केले. या विमानाचे परीक्षण, देखरेख करणाऱ्या दुसऱ्या एका तेजस ट्वीन सीटर विमानानेही केले.  

अस्त्र (ASTRA) हे अत्याधुनिक हवेतून हवेत मारा करणारे BVR क्षेपणास्त्र, ध्वनीपेक्षा जास्त वेगाच्या हवाई लक्ष्यांना भेदून नष्ट करते. संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL), संशोधन केंद्र इमरात (RCI) आणि DRDO च्या इतर प्रयोगशाळा यांनी एकत्रितपणे त्याची निर्मिती आणि विकास केला आहे.  स्वदेशी बनावटीच्या ASTRA BVR क्षेपणास्त्राचे, स्वदेशी तेजस लढाऊ विमानावरून प्रक्षेपण, हे ‘आत्मनिर्भर भारत’ लक्ष्यपूर्तीच्या दिशेने एक महत्वाचे पाउल आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस-एलसीए वरून क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल, ADA, DRDO, CEMILAC, DG-AQA आणि उद्योग यांची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की या प्रक्षेपणामुळे तेजसच्या लढाऊ क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि आयात केलेल्या शस्त्रास्त्रांवरील अवलंबित्व कमी होईल. संरक्षण विभागाचे (R&D) सचिव आणि DRDO च्या अध्यक्षांनीही या यशस्वी प्रक्षेपणात सहभागी झालेल्या चमूंचे अभिनंदन केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »