महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर

कल्याणात राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इंटक महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याणात राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इंटक महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे युवराज राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इंटक काँग्रेसतर्फे कल्याणमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इंटकचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश मुथा यांनी करून प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन केले.

नुकतेच पक्षाच्या हायकमांडने प्रकाश मुथा यांची इंटकच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. राज्य कार्यालयाच्या उद्घाटनानंतर जनतेला संबोधित करताना मुथा म्हणाले की, इंटकच्या माध्यमातून गरीब मजूर व कामगारांच्या प्रत्येक समस्या सोडविल्या जातील. संघटनेत माणसे जोडणे हे आमचे पहिले प्राधान्य असेल, असे ते म्हणाले. या समारंभात आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त करताना मुथा म्हणाले की, आपल्याला संघटना मजबूत करायची असून त्यासाठी तुमची साथ व सहकार्य आवश्यक आहे.

यावेळी इंटकचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, काँग्रेस नेते व मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा, डॉ.डी.एस.पालीवाल, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जयनारायण (मुन्ना) पंडित, कमलादेवी महाविद्यालयाचे अध्यक्ष सदानंद (बाबा) तिवारी, संदीप नहरी, डॉ. , जयदीप सानप, राजा जाधव, युवा नेते अविनाश मुथा, माया कटारिया यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »