नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
रत्नागिरी/प्रतिनिधी – उद्योग संचालनालय, स्मॉल इंडस्ट्रिज डेव्हलमेंट बँक ऑफ इंडिया (सीडीबी) आणि आयडीबीआय कॅपीटल डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रिज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने इंडस्ट्रिज गव्हरन्मेंट नेटवर्कीग फॉर एक्सक्ल्युझीव ट्रॉन्सफॉरमेशन आणि इनपाॉवरमेंट अर्थात ‘इग्नाईट’ या कार्यशाळेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या निमित्ताने यावेळी आयोजित केलेल्या वस्तू विक्री प्रदर्शनाचे देखील उद्योगमंत्री सामंत यांनी उद्घाटन केले. या प्रदर्शनाची पाहणी करत त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला.जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने अशा कार्यशाळा तालुक्यात झाल्या पाहिजेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून केंद्र व राज्याच्या योजना विशेषत: पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, विश्वकर्मा आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तळागाळात पोहचल्या पाहिजेत. यातून नवे उद्योजक निर्माण होतील, त्यासाठी बँकांनी सकारात्मक आणि संवदेनशील दृष्टीकोण ठेवावा, अशी अपेक्षा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण यावेळी लाभार्थ्यांना करण्यात आले.