DESK MARATHI NEWS ONLINE.
कल्याण/प्रतिनिधी :- शालेय विद्यार्थ्यांच्या क्रिडा क्षेत्रातील कला गुणांना वाव मिळावा यासाठी कल्याण पश्चिमे कडील छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालयात नूतन क्रिकेट ॲकॅडमीचे उदघाटन व शुभारंभ जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
नूतन क्रिकेट ॲकॅडमीचा शुभारंभ व उदघाट्न सोहळा शनिवारी सकाळी दहा वाजता आयोजीत करण्यात आला होता.ॲकॅडमीचा शुभारंभ व उदघाट्न जिल्हा शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे सर, सरचिटणीस डॉ. निलेश रेवगडे सर,चिटणीस मीनाक्षी गागरे, भारती वेदपाठक,क्रिकेट प्रशिक्षक मोबिन शेख, अजहर( भाई) काझी, माजी एम.सी.ए निरीक्षक राजेश राणे सर, तसेच संस्थेचे आजी- माजी पदाधिकारी, पालक, हितचिंतक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदघाट्न प्रसंगी शिक्षणाधिकारी दहितुले मॅडम यांनी बॅटिंग करत क्रिकेटचा प्रत्यक्ष आनंद घेतला.नविन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे असे मत जिल्हा शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले मॅडम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले . तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत तरटे सर यांनी आमच्या संस्थेच्या विविध शाळांतून गुणवंत विद्यार्थी नावारूपाला येतील अशी ग्वाही उपस्थितांना दिली. नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका
रेश्मा सय्यद यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी गुणवत्तेचा विकास करणारी नूतन विद्यालय ही कल्याण मधील पहिली शाळा असल्यामुळे अभिनव उपक्रमाचे सर्व क्षेत्रातून भरभरून कौतुक होत आहे.सदर वृत्त शाळेच्या जेष्ठ शिक्षिका शुभांगी भोसले यांनी दिले.