महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

आशा सेविकांच्या हाती मतदान जनजागृतीची दोरी, उभारू लोकशाहीची गुढी

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – मतदानाचा अधिकार हा लोकशाही समाजातील मुलभूत अधिकार आहे. तसेच लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे. सक्षम लोकशाहीसाठी ‘आपल्या मताचे करा दान, ही आहे लोकशाहीची जाण’… हा नारा घेऊन आशा सेविकांनी घरोघरी मतदान जनजागृती करत लोकशाहीची ही गुढी उभारण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.

देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. यासाठी यंदाच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या मतदानाचा हा पवित्र हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीपच्या माध्यमातून जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविणे, 18 वर्षावरील नव मतदारांची नोंदणी करणे, दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी करून घेणे इत्यादी कामे स्वीपच्यामार्फत हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्वीपअंतर्गत आशा सेविका तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना वेळोवेळी प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. घरोघरी जनजागृती करतांना मतदार हेल्पलाइन voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि सक्षम Saksham-ECI ॲपच्या माध्यमातून नव मतदारांचे अर्ज भरून घेणे, मतदार यादीत नाव तपासणे किंवा नोंदणी करणे इत्यादी बाबत मतदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

मतदान करणे हा केवळ अधिकारच नाही, तर ती आपली नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे. त्यामुळे आपला समाज सुधारायला हवा, तसेच त्याची उन्नती होण्यासाठी आणि जनतेला एक चांगला लोकप्रतिनिधी मिळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वेळात वेळ काढून मतदान करायलाच हवे.

Related Posts
Translate »