नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
उल्हासनगर/प्रतिनिधी – भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे गोळीबार प्रकरण संपूर्ण देशात गाजले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. होती आज त्याची न्यायालयासमोर सुनावणी होती. सकाळी त्यांना उल्हासनगरच्या न्यायालयात नऊ वाजता हजर करण्यात आले होते. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या सह चार आरोपींना उल्हासनगर न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. आज सकाळी या पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी अटक केल्यानंतर त्यांना पहिले १४ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार आज अटक असलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे आज आरोपींना सकाळी नऊ वाजताच न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कोर्टाच्या परिसरात संचारबंदी देखील लागू केली होती. तसेच यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयात आज दोन्ही बाजूने एक तास युक्तिवाद चालला,सरकारी वकिलांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली, मात्र सरकारी पक्षाने नवीन न्यायालयासमोर कोणतेही नवीन मुद्दे न आणल्याने अखेर न्यायालयाने गणपत गायकवाड यांच्यासह चार जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.



