नेशन न्यूज मराठी टीम.
नंदुरबार / प्रतिनिधी – नंदुरबार जिल्ह्यात दूध भेसळीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर अनेक तक्रारी जिल्हा नियंत्रण समितीकडे प्राप्त होत होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा नियंत्रण समिती आणि अन्न औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस दलाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईचे सत्र सुरू आहे.
शहादा तालुक्यातील खाजगी दूध डेअरी तसेच खाजगी दूध विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून अनेक ठिकाणचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.तर एका डेअरी चालकाकडे अन्न औषध प्रशासन विभागाचा परवाना नसल्याने त्याच्या विरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अचानक दूध विक्रेत्यांचा विरोधात सुरू झालेल्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केलेले आहे .पुढेही जिल्हाभरात ही कारवाई अशीच चालू राहावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



