नेशन न्युज मराठी टीम.
नागपूर/प्रतिनिधी – नागपुरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नागपुरात 592 रुग्णांच्या तपासणी मध्ये 61 रुग्ण हे डेंगू पॉजिटिव निघाले असून सगळ्यात जास्त रुग्ण हे पूर्व नागपुरातील आहे. विजय नगर भागात राहणाऱ्या इसम हा डेंग्यू पॉजिटिव होता. त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले आहे.
डेंग्यूचे रुग्ण शहरात वाढत असल्याने आता नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागावर त्यावर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. नागपूर शहरात आजपर्यंत आढळलेल्या ६१ पैकी अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण गेल्या महिन्याभरातील आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात कीटकनाशक फवारणीसह डेंग्यू आजाराबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे. डेंग्यूचे लक्षणे दिसताच तातडीने उपचार घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.



