महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे थोडक्यात

भिवंडी लोकसभेत ३६ उमेदवारांची ४३ नामनिर्देशनपत्रे वैध तर ५ उमेदवारांचे अर्ज अवैध

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शनिवार दि 04 मे 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता पार पडली. या छाननी प्रक्रियेत 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात 5 अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता निवडणुकीत 36 उमेदवारांचे 43 नामनिर्देशनपत्रे वैध ठरले आहेत, अशी माहिती 23-भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.
23 – भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार दि. 03 मे 2024 रोजी दुपारी 03.00 वाजता संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर 23, भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 41 उमेदवारांनी आपले 48 अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जाची शनिवार, दि. 04 मे 2024 रोजी छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे 23 भिवंडी लोकसभेचे सर्वसामान्य निरीक्षक श्री. राजनविर सिंग कपूर (आयएएस) हे उपस्थित होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची 23- भिवंडी लोकसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी छाननी केली.
23, भिवंडी लोकसभा मतदारसंघात 36 उमेदवारांचे 43 अर्ज वैध तर 05 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.

23, भिवंडी लोकसभा मतदारसंघात अवैध ठरलेले उमेदवार :- 5
1) शमशुद्दीन शेख – बळीराजा पार्टी
2, देवेश पाटील – अपक्ष
3) विठ्ठल कांबळे – अपक्ष
4) वारस्मिया दादुमिया शेख- पिस पार्टी
5.मोहम्मद खान अक्रम – अपक्ष

वैध अर्ज केलेल्या उमेदवारांना दि. 06 मे 2024 रोजी दु.3.00 वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

Related Posts
Translate »