नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – देशात आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे. अमीर अधिक अमीर, गरीब अधिक गरीब होत आहेत, याचे कारण देशात चलन व्यवस्था अस्थिर आहे.चलन स्थिर राहण्यासाठी देशातील कोणत्याही शासनाने गंभीरता दाखविली नाही. जर देश डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालला असता तर,देशात गरीब-श्रीमंत अशी विषमता राहिली नसती असे प्रतिपादन जेष्ठ अर्थतज्ज्ञ डाॅ.श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘ प्रॉब्लेम ऑफ रुपी ‘ पुस्तकाचा समकालीन संदर्भ आणि आजचे वास्तव’ या विषयावरील विदर्भस्तरीय चर्चासत्रात अध्यक्षीय चिंतनशील विचार व्यक्त केले.
प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाला 100 वर्षे पूर्ण झाल्यामुळे फुले-आंबेडकर विद्वत सभेचे उंटखाना, नागपूर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उदघाटन भंते धम्मसारथी यांनी केले.
अर्थशास्त्राचे अभ्यासक व वक्ते म्हणून प्रा.डाॅ. प्रज्ञा बागडे व प्रा. डाॅ. अमित झपाटे उपस्थित होते. प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशप्रेम ठिकठिकाणी व्यक्त होते,तसेच दीन- दुसऱ्यांचे अश्रु पुसण्याची कळकळही व्यक्त होते,असे विचार प्रा.डाॅ.प्रज्ञा बागडे यांनी व्यक्त केले,तर अमित झपाटे यांनी या ग्रंथातील दाखले देऊन डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची कशी पायमल्ली होत आहे ते समजावून सांगितले.
प्रास्ताविक प्रा.डाॅ.मनोज निकाळजे यांनी तर भूमिका भास्कर भोजने यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.केशव मेंढे यांनी केले तर आभार प्रा.डाॅ.मनोहर नाईक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डाॅ.विठ्ठल खाडे,प्रा.रुपेंद्र खांडेकर, प्रा.डाॅ.पूनम येसंबरे,प्रा.तुलसीदास तागडे, एड.अनिकेत मून, महेंद्र पुडके, प्रा.डाॅ.जवी कोटांगळे, प्राचार्य रत्नाकर डाहाट,प्रा.कार्तिक पाटील, इंजि.राहुल दहीकर, इंजि. संजय कसर,प्रा.नलिनी खांडेकर, धरमदास पांडे, वंदनाताई पेटकर, प्रा.डाॅ.संजीव इंगळे,प्रा.गौतम डांगे,प्रा.अमित भगत इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले. बबन चांहादे, उत्तम शेवडे, सतीश जीवने,डाॅ.सतीश हुमणे यांची कार्यक्रमात उपस्थिती होती. अकोला, बुलढाणा,अमरावती, वर्धा,चंद्रपूर व गडचिरोली येथून फुले-आंबेडकर विद्वत सभेचे समन्वयक कार्यक्रमात सहभागी झाले होते.



