महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी महाराष्ट्र

प्राण जाये पर पाणी न जाय -काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे

सोलापूर /प्रतिनिधी – सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरुद्ध सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनासह राजकीय पक्ष आक्रमक झाले असून आता या वादात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने उडी घेतली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी उजनीच्या पाण्यासाठी प्राण जाये पर पाणी न जाय अशी भूमिका घेतली आहे.
येत्या जून,जुलै,आगस्ट महिन्यात सोलापूर शहराला एक दिवसाआड पाणी मिळावे.उजनीच्या पाण्याची गळती होत असून येत्या एक महिन्यात उजनीच्या गळतीची दुरुस्ती करून ताबडतोब सोलापूरकराना हक्काचं पाणी मिळाले पाहिजे.यामध्ये कुठला अधिकारी हलगर्जीपणा करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या हक्काच ५ टीएमसी पाणी इंदपूरला पळविल्याचा आरोप होत असून त्याअनुषंगाने आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.याआधीही पाण्याच्या प्रश्नावरून काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला होता.उजनी धरणातील पाणी वाटपावरून आधीच सोलापूर विरुद्ध मराठवाडा यांच्यात वाद सुरू आहे.पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याची प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्यावरून वाद पेटला असून जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्र्यांच्या विरुद्ध आंदोलने सुरू आहेत.त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याला महत्व आले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »