DESK MARATHI NEWS.
मुंबई/प्रतिनिधी -मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III ने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (सीएसएमआय) विमानतळावर एका भारतीय नागरिकाला ताब्यात घेतले. सदर प्रवासी इंडिगो फ्लाइट क्र. 6 इ 1052 द्वारे बँकॉकहून भारतात दाखल झाला होता.
प्रवाशाच्या नोंदवलेल्या सामानाची तपासणी आणि वैयक्तिक झडतीदरम्यान अधिकाऱ्यांनी, हायड्रोपोनिक पद्धतीने पिकवलेला 5,119 ग्रॅम गांजा हस्तगत केला. तो सामानामध्ये लपवून ठेवण्यात आला होता. जप्त केलेल्या या अमली पदार्थाचे बेकायदेशीर बाजारमूल्य अंदाजे ₹5.119 कोटी आहे.
अंमली पदार्थ आणि मानसिक प्रभाव टाकणारी द्रव्ये (एनडीपीएस ) कायदा, 1985 अंतर्गत सदर अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. प्रवाशाला तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.