महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image लोकल बातम्या

पत्रकार कुणाल म्हात्रे यांना रोटरी क्लब ऑफ कल्याणचे मानद सदस्यत्व प्रदान

नेशन न्यूज मराठी टिम.

कल्याण/प्रतिनिधी  कल्याणातील पत्रकार कुणाल म्हात्रे यांना कल्याण मधील सर्वात जुन्या “रोटरी क्लब ऑफ कल्याण”चे मानद सदस्यत्व रोटरीचे जिल्हा प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कल्याणचे अध्यक्ष राम मराठे, सचिव अरुण सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुवारी सायंकाळी कल्याण पश्चिमेतील रोटरी सभागृह, सार्वजनिक वाचनालय याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.

 कुणाल म्हात्रे हे गेल्या १२ वर्षांपासून विविध वृत्तपत्रात पत्रकारिता करत आहेत. ते कल्याण डोंबिवली पत्रकार संघ कार्याध्यक्ष, प्रेस क्लब कल्याण उपाध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट कार्यकारणी सदस्य, प्रेस असोसिएशन कल्याण डोंबिवली कार्यकारणी सदस्य आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ कल्याणच्या वतीने त्यांना मानद सदस्यत्व प्रदान केलं आहे. 

जिल्हा प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी यावेळी उपस्थित सदस्यांना रोटरी क्लब बाबत माहिती सांगत आगामी काळात कोण कोणते प्रकल्प कशाप्रकारे राबविता येतील याबत मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक कामे डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत रोटरी क्लब पोहचविण्याचे आवाहन केले.

 यावेळी रोटरी जिल्हा प्रथम महिला माधवी कुलकर्णी,  माजी अध्यक्ष दिलीप कर्डेकर, सुषमा पटेल, स्मृति पवार, रोहीणी  बाऊसकर, सुदीप सोपारकर, दीपक पटेल, अशोक खंडेलवाल, जय राठोड आदि जण उपस्थित होते. दरम्यान यावेळी जयश्री कर्डेकर, प्रियंका मराठे यांना नवीन सदस्यत्व देण्यात आले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पराग कापसे यांनी केले.  

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »