नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – माघी गणेशोत्सवानिमित्त बेतूरकर पाडा येथील नागरिकांसाठी अलका सावली प्रतिष्ठान व बेतूरकरपाडा रहिवाशी मित्र मंडळ यांच्यावतीने आरोग्य शिबीराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी होत असला तरी नागरिकांचे आरोग्य निरोगी आणि सुधृड रहावे यासाठी रविवारी बेतूरकरपाडा येथील नाना वायले चाळ येथे अलका सावली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले व बेतूरकरपाडा रहिवाशी मित्र मंडळ यांच्या सहाय्याने माघी गणेशोत्सव निमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. विभागातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद देत शिबीराचे लाभ घेतला.
या शिबिरात ई.सी.जी, पल्स, ब्लडप्रेशर, आरबीएस, कॉलेस्ट्रॉल, ऑक्सिजन तपासणी करण्यात आली. तसेच बेतूरकरपाडा रहिवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश वायले व कार्याध्यक्ष गणेश बेतूरकर यांनी सहकार्य केल्या बद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अलका सावली प्रतिष्ठानचे कार्यकर्ते निलेश पाटील, सागर वाघ, प्रसाद पवार, स्वप्नील गुरव, मितेश बाऊस्कर्, तुषार देशमुख, सत्यम पाटील, वैभव देशमुख, प्रशांत बावसकर, राहुल पाटील, आकाश वायले, जयेश वायले आदी जण उपस्थित होते.