महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

विविध मागण्यांसाठी अकोला महानगरपालिकेवर वंचितचा भव्य मोर्चा

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/t2K51LgoR10

अकोला/प्रतिनिधी – महापालिकेने वाढविलेला अवाजवी घर कर रद्द करण्यात यावा, चुकीची पाणी करवसुली थांबविण्यासह शहरातील सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी अकोला महानगरच्यावतीने आज अकोला महानगरपालिकेवर हजारो अकोलेकरांच्या उपस्थितीत धडक मोर्चा काढला. झोपलेल्या मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. अकोला महानगरपालिकेने वाढविलेला अवाजवी घर कर रद्द करण्यात यावा, चुकीची पाणी करवसुली थांबविण्यात यावी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यात यावे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाचे सौंदर्यीकरण करून परिसरात घाण कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, शहरातील कलावंतांसाठी सांस्कृतिक भवन सुरू करण्यात यावे, मनपा हद्दीतील दवाखान्यांमध्ये अत्याधुनिक सेवा देण्यात यावी, अतिक्रमित जागा नियमाकूल करून घरकुलांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावा, शहरातील घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था करण्यात यावी, न्यू तापडिया नगरजवळील रेल्वे गेट उडाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे तसेच मनपा हद्दवाढीत समाविष्ट गावांच्या भागात मूलभूत सुविधा देण्यात याव्या आदी मागण्यांना घेऊन झोपलेल्या मनपा प्रशासनाला जागे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महानगराध्यक्ष तथा जि.प.सदस्य शंकरराव इंगळे यांच्यासह कलीम पठाण, महिला आघाडी महानगराध्यक्ष वंदनाताई वासनिक, युवा आघाडी महानगराध्यक्ष आशिष मांगुळकर, जय तायडे यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता.२०) अकोला महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, माजी जि.प.अध्यक्ष बालमुकुंद भिरड, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, वंचितचे नेते निलेश देव, मनोहर पंजवाणी, माजी गटनेते गजानन गवई, माजी नगरसेविका किरण बोराखडे, प्रा. संतोष हुसे, दामोदर जगताप, अॅड. संतोष राहाटे, माजी सभापती आकाश शिरसाट, शोभाताई शेळके, सुवर्णा जाधव, सरला मेश्राम, पराग गवई, सीमांत तायडे, नितेश कीर्तक, बुध्दरत्न इंगोले, राहुल अहिरे, माजी नगरसेवक रामा तायडे, श्रीकांत घोगरे, राजकुमार दामोदर, सुनिता गजघाटे, प्रतिभा अवचार, कुणाल राऊत, मनोहर बनसोड, अॅड. मिनल मेंढे, अमोल कलोरे, नितीन सपकाळ, गजानन दांडगे, प्रा. सुरेश मोरे, संतोष गवई, रितेश यादव, प्रदिप चौरे, मंतोषी मोहोड, पुरुषोत्तम अहिर, विजय तायडे, सुजित तेलगोटे, आदित्य इंगळे, प्रविण पातोडे, महेंद्र डोंगरे, शंकर लाजुसकर, सुरेश कलोरे, पप्पु मोरे, मिलिंद आकोडे, रमाबाई गवई, माया इंगळे, मंगला घाटोळ, संगीता खंडारे, उमा अंभोरे, पार्वताबाई लहाणे यांच्यासह हजारोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महानगरातील नागरिक उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »