महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

वाढती महागाई तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ वंचितची भव्य पदयात्रा

नेशन न्यूज मराठी टीम.

कोल्हापूर/प्रतिनिधी – बिंदू चौकात सुरु झालेली ही पदयात्रा शिवाजी रस्ता मार्गे शिवाजी चौक तिथून भाऊसिंगजी रस्त्याने महानगरपालिका मार्गे सीपीआर चौकात येऊन राजर्षी छत्रपती शाहु समाधी स्थळावर तिची सांगता झाली. वाढती महागाई , बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची कोल्हापूरात भव्य पदयात्रा काढण्यात आली होती .

राज्य सरकार चुकीची धोरणे राबवून संविधान धोक्यात आणण्याचे काम करत आहे. जो काही छुपा अजेंडा राज्य सरकार राबवत आहे तो जनतेसमोर यावा अशी मागणी कोल्हापूरच्या प्रभारी डॉक्टर क्रांतीताई सावंत यांनी यावेळी केली.राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन महागाई कमी करावी. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूरचे निरीक्षक अतुल बहुले यांनी दिला.

या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शाहु महाराजांचा विजय असो, छत्रपती शाहु महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परीसर दणाणून सोडला.ही पदयात्रा शाहु महाराज समाधी स्मारकावर पोहचण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी भाऊसिंगजी रस्त्यावर ज्या ठिकाणी छत्रपती राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून दिले त्या ऐतिहासिक ठिकाणी भेट दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून या सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलींद पवार, पदयात्रेचे नेत्रुत्व डॅा. क्रांतीताई सावंत यांनी केले यावेळी कोल्हापूरचे निरीक्षक अतुल बहुले यावेळी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »