महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश महत्वाच्या बातम्या

फेक आंतरराष्ट्रीय फोन कॉल ब्लॉक करण्यासाठी सरकारने दिले निर्देश

नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय मोबाईल क्रमांक दिसेल अशा प्रकारे भ्रष्ट नक्कल केलेले आंतरराष्ट्रीय फोन कॉल भारतीय नागरिकांना करुन काही घोटाळेबाज, सायबर-गुन्हे आणि आर्थिक फसवणूक घडवून आणत असल्याचे प्रकार सध्या उघड होत आहेत. हे कॉल्स भारतातून आलेले भासतात, मात्र ते कॉलिंग लाइन आयडेंटिटी (CLI) या फोन करणाऱ्याची ओळख पटवणाऱ्या तांत्रिक यंत्रणे मध्ये फेरफार करून परदेशातील सायबर-गुन्हेगारांनी केलेले असतात. बनावट डिजिटल अटक (अधिकाऱ्यांच्या बनावट आवाजा द्वारे कायद्याचा धाक) , FedEx घोटाळे, कुरिअरमधील औषधे/अंमली पदार्थ, सरकारी आणि पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत केलेली तोतयेगिरी ,दूरसंचार विभाग/ट्राय अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनी क्रमांक खंडीत करणे अशा प्रकरणांमध्ये अशा आंतरराष्ट्रीय स्पूफ्ड कॉलचा गैरवापर झाला आहे.

दूरसंचार विभाग आणि दूरसंचार सेवा प्रदाते यांनी, असे येणारे आंतरराष्ट्रीय स्पूफ्ड कॉल्स ओळखून ते भारतीय दूरसंचार ग्राहकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून ते रोखण्यासाठी एक प्रणाली तयार केली आहे. आता असे येणारे आंतरराष्ट्रीय स्पूफ्ड कॉल्स रोखण्याचे निर्देश, दूरसंचार सेवा प्रदात्यांना जारी करण्यात आले आहेत. दूरसंचार सेवा विभागाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, भारतीय लँडलाइन क्रमांक दाखवणारे आंतरराष्ट्रीय स्पूफ्ड कॉल्स, दूरसंचार सेवा प्रदात्यांद्वारे आधीच रोखले (ब्लॉक) जात आहेत.

वापरकर्त्यांची सुरक्षितता आणि सुरक्षा हा डिजिटल इंडियाच्या दूरदृष्टीचा अविभाज्य भाग असल्याने, दूरसंचार वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी दूरसंचार विभागाने (https://sancharsaathi.gov.in/) या नागरिक केंद्रित संचार साथी पोर्टलसह अनेक पावले उचलली आहेत. फसवणूकीचे असे प्रकार रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करूनही, इतर मार्गांनी फसवणूक करणारे काही घोटाळेबाज अजूनही असूच शकतात. अशा कॉल्सबाबत, तुम्ही संचार साथी पोर्टलवर उपलब्ध चक्षू सुविधेवर अशा संशयित फसवणुकीच्या कॉल्सची तक्रार करून सर्वांना मदत करू शकता.

Related Posts
Translate »