DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/प्रतिनिधी – मागील काही दिवसात सोन्याच्या दराने मोठ्या प्रमाणात उच्चांक गाठल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काही दिवस सोने खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याचे चिन्ह दिसत होते पण वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते.अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केले जाते.98 हजारवर सोन्याचा भाव आला असूनही आजच्या दिवशी डोंबिवलीत सोने खरेदी करण्याकरता ज्वेलर्स दुकानात गर्दी झाली होती.
डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील वामन हरी पेठे सन्स मध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर डोंबिवलीकर आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अमित काळे म्हणाले, सोन कितीही महागले तरी सोने बरोबर ज्वेलरी, सोननाण खरेदी करतात. साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय मुहूर्तावर ज्वेलरी बरोबर नाणी विक्री करता वामन हरी पेठे सन्स मध्ये सोय करण्यात आली आहे.तर शैलेश दाबके म्हणाले,अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने आणि नाणी खरेदीवर भर होता. तर सोने खरेदीकरता आलेल्या एका महिलेने सोन किती महागल तरी थोडफार कां होईन सोन खरेदी करण्याची इच्छा असते.डोंबिवलीतील अनेक ज्वेलर्स दुकानात सायंकाळी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती.