नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – चालत्या ट्रेनमधील प्रवाशाच्या हातावर फटका मारुन मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात कल्याण रेल्वे पोलिसांना यश आले आहे. २५ मार्चला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये जाहिद जैती नावाचा व्यक्ती इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना तो दारात उभा राहून सेल्फी घेत होता. जाहिद सेल्फी व्हिडिओ घेत असताना एका चोरट्याने जाहिदच्या हातावर फटका मारुन मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. जाहिदने मोबाईलसाठी ट्रेनमधून उडी मारली यामध्ये तो गंभीर जखमी झाला व यामध्ये त्याचा मृत्यु झाला.
त्याच्या मोबाईलमधील व्हिडिओत तो चोरटा कैद झाला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी लगेच त्या आरोपीला उल्हासनगरहून अटक केली आहे. या आरोपीचे नाव आकाश जाधव असे आहे. त्याच्याकडून आणखीन एक महागडा मोबाईल हस्तगत केला आहे. जेव्हा चोरलेला हा माोबाईल सुरु करण्यात आला. तेव्हा माहिती पडले की, हा मोबाईल पुण्यात राहणारे प्रभास भणगे यांचा आहे. ज्यांचा २५ तारखेच्या मध्यरात्री कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. त्यांचे नातेवाईक कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात उभे असताना. वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांनी त्याच मोबाईलहून फोन केला तेव्हा माहिती पडले की, हा मोबाईल प्रभास भणगे यांचा होता. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती कल्याण जीआरपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली आहे.