महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

मुंबईत एफएसएसएआय अधिकारी लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने सहाय्यक संचालक, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय), प्रादेशिक कार्यालय, मुंबई आणि खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तीन व्यक्तींसह चार जणांना अटक केली आहे. यामध्ये ठाणे स्थित एका खाजगी कंपनीचा संचालक,  एक वरिष्ठ व्यवस्थापक आणि आणखी एक प्रतिनिधी यांचाही समावेश आहे.  या  खाजगी कंपनीची प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी 1.20 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. 

सीबीआयने सहाय्यक संचालक (तांत्रिक विभाग) अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांच्यासह तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये ठाणे स्थित खाजगी कंपनीचे संचालक आणि एक वरिष्ठ व्यवस्थापक, खाजगी कंपनी, आणि आणखी एक अज्ञात व्यक्ती यांचाही समावेश आहे.  सहाय्यक संचालक एफएसएसएआय, प्रादेशिक कार्यालय, मुंबई, हे अनेक मध्यस्थांच्या संगनमताने, सार्वजनिक सेवक या नात्याने सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यात अप्रामाणिकपणा अन्न पदार्थ व्यवसायिक  आणि इतर इच्छुकांकडून लाच मागणे आणि स्वीकारणे या बेकायदेशीर आणि भ्रष्ट पद्धतींमध्ये गुंतलेले आहेत अशा आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.  आरोपी अधिकाऱ्याने खाजगी कंपनीच्या आरोपी वरिष्ठ व्यवस्थापकाकडून लाच घेण्यास सहमती दर्शवली होती.

सीबीआयने सापळा रचून आरोपी सहाय्यक संचालक, एफएसएसएआय याला सदर वरिष्ठ व्यवस्थापक आणि खाजगी कंपनीच्या दुसऱ्या प्रतिनिधीकडून 1,20,000/- रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.  लाचेच्या पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली.  त्यानंतर खासगी कंपनीच्या आरोपी संचालकालाही अटक करण्यात आली.

आरोपींच्या कार्यालयात आणि निवासी परिसरात झडती घेण्यात आली असून, त्यामध्ये सुमारे  37.3 लाख रुपये रोख रकमेच्या स्वरूपात तर सुमारे 45 ग्रॅम सोने आणि विविध स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे आढळली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना  न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 08.05.2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

Related Posts
Translate »