महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image आरोग्य ताज्या घडामोडी

१३ सप्टेंबरपासून लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे मोफत पाचदिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिर

नेशन न्यूज मराठी टीम.

औरंगाबाद/प्रतिनिधी – लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे आणि महात्मा गांधी मिशन (एमजीएम) आणि औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ आयोजित ४६ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला मंगळवार, दि. १३ सप्टेंबर पासून प्रारंभ होत असून, शिबीर शनिवार, दि. १७ सप्टेंबर पर्यंत चालेल.
या शिबिरात अमेरिकेतील प्रख्यात सर्जन डॉ. राज लाला यांच्यासह डॉ. ललिता लाला आणि डॉ. अमित बसन्नवार हे रुग्णांवर शस्त्रक्रिया करतील. शिबिराचे हे ४६ वे वर्ष आहे. शिबिराचे उदघाटन मंगळवार, दि. १३ रोजी सकाळी साडे आठ वाजता होईल.

या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लब अध्यक्ष ला. विजय अग्रवाल तर प्रकल्प प्रमुख म्हणून ला. डॉ. प्रवीण सूर्यवंशी आहेत. या शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता नेमण्यात आलेल्या समित्यांमध्ये आयोजन समिती, मेडिसिन समिती, पोस्ट ऑपरेशन समिती, रजिस्ट्रेशन समिती, फूड समिती यांच्यासह विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, त्या कार्यरतही झाल्या आहेत. यात प्रकल्प सचिवपदी ला. प्रीती जैन, सहप्रकल्पप्रमुख ला.कल्याण वाघमारे, ला.भूषण जोशी आणि ला. डॉ उज्ज्वला दहीफळे यांचा समावेश आहे.

शिबीराकरिता नेमण्यात आलेल्या विविध समित्यांमध्ये सल्लागार म्हणून ला.राजेंद्र दर्डा, ला. डॉ. भागवत कराड, ला.अरविंद माछर तर साहसामान्यकपदी ला. बिमलकुमार टिबडीवाला आहेत. इतर समित्यांत ला.रमेश पोकर्णा, ला.सुरेशचंद्र बापना, ला.जी एम बोथरा, ला.प्रकाश गोठी, ला.नरेंद्र गुप्ता, ला.जे. के. जाधव, ला.गुरदीपसिंग राजपाल, ला.सुभाष झांबड, ला.राजेश लहुरीकर, ला.रवींद्र करवंदे, ला.राकेश अग्रवाल, ला.राजेश भारुका, ला.निधी अग्रवाल, ला.अर्चना खोत, ला.जयकुमार थानवी, ला.राजकुमार टिबडीवाला, ला.डॉ. मनोहर अग्रवाल, ला.डॉ. दत्ता कदम, ला.राजेश लुंडिया, ला.राजेंद्र लोहिया, ला.संजीव गुप्ता, ला.सुरेश साकला आदींसह इतर अनेक सदस्यांचा समावेश आहे.

लायन्स आय हॉस्पिटल, एन-१, सिडको, राधाकृष्ण मंदिराजवळ येथे उदघाटन समारंभ आणि रुग्ण तपासणी होईल. या ठिकाणी शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची निवड करून त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारीख तसेच वेळ दिली जाईल. बुधवार, दि. १४ पासून एमजीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया होतील. शस्त्रक्रियेत डॉ लाला आणि इतरांना एमजीएममधील डॉक्टर तसेच नर्स आणि इतर स्टाफ मदत करेल. एमजीएम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रवीण सूर्यवंशी या प्रकल्पाचे प्रमुख आहेत.

गेल्या ४५ वर्षांत या शिबिरांमधून १३ हजार ४३६ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या असून, यंदा दीड हजार रुग्णांची तपासणी आणि साडेचारशे रुग्णांवर शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट आयोजकांनी ठेवले आहे. शिबिरात आवश्यक औषधांचा पुरवठा औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनतर्फे करण्यात येणार आहे.
संपूर्ण मराठवाडा, लगतचे विदर्भ आणि खान्देशातील जिल्हे येथून रुग्ण शिबिरात उपचाराकरिता येतात। या शिबिराची सर्वदूर आणि गोरगरिबांपर्यंत माहिती पोहोचावी याकरिता गेल्या कित्येक दिवसांपासून लायन्सचे पदाधिकारी, सदस्य प्रयत्नशील आहेत. याकरिता प्रचार रथाच्या माध्यमातून तसेच पोस्टर, पॉम्पलेट याद्वारेही प्रचार करण्यात आला आहे. ऑनलाईनही प्रचार करण्यात आलेला आहे. संपूर्णतः निशुल्क असलेल्या या शिबीराकरिता समाजातील दानशूर व्यक्तींकडून निधी गोळा करण्यात येतो.

शिबिरात दुभंगलेले ओठ, पडलेली पापणी, चेहऱ्यावरील व्रण, नाकावरील बाह्य विकृती, जळालेल्या, भाजलेल्या,असलेल्या रुग्णांवरच शस्त्रक्रिया करण्यात येतील. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना व्हावा याकरिता लायन्स क्लब ऑफ लायन्स क्लब औरंगाबाद-चिकलठाणाचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत. असे आवाहन क्लबच्या वतीने करण्यात आले आहे

डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या सहभाग आणि पुढाकाराने औरंगाबादमध्ये या शिबिराचा प्रारंभ झाला. लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणाने यात प्रमुख भूमिका निभावली आणि गेली ४६ वर्ष रुग्णसेवेचा हा महायज्ञ अव्याहत सुरु आहे. प्रकृती साथ देत नसतानाही डॉ. दीक्षित यांनी ३७ वर्षे या शिबिरांतून शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य आणि या शिबिरात डॉ. दीक्षित यांच्याबरोबर सहभाग घेणारे डॉ. राज लाला यांनी हे काम मोठ्या निष्ठेने पुढे सुरु ठेवले आहे. दरवर्षी रुग्णांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद हा आयोजक आणि डॉक्टरांच्या कार्याची पावतीच म्हणावी लागेल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »