DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली मधील टिळक नगर हद्दीतील परिसरात एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला ,खोलीत कोंडून लैंगिक अत्याचार ,गर्भपात करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर यावरच न थांबता नराधमांनी त्या बलिकेलावेश्याव्यवसायात ढकलले. या लाजिरवाण्या घटनेतील मुख्य आरोपी फरार असून एका जोडप्याला आणि दोन ग्राहकांना टिळक नगर पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे
फिर्यादीच्या तक्रारी वरुन आरोपी अतितोष राजपूत याच्यावर विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका १५ वर्षीय मुलीला विविध अत्याचार केल्या प्रकरणी आणि मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या मुस्कान नामक महिला आणि तिचा नवरा व दोन ग्राहकांना टिळक नगर पोलिसांनी गडाआड केले
मुलीला पळवून नेणारा आरोपी अतितोष राजपूत अद्याप फरार दरम्यान पीडितेची दोन महिन्यांनी सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे .
आरोपींवर पॉस्का ,बलात्कार , पिटा, अपहरण अशा विविध कलमा अन्वये डोंबिवली मधील टिळक नगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.