महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

भेसळीच्या संशयावरून पनीर, खव्याचा मोठा साठा जप्त

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे / प्रतिनिधी – अन्न व औषध प्रशासनास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी महापे एमआयडीसीमधील मे. भास्कर डेअरी (सर्व्हे नं.62/1, जीटीएल कंपनीजवळ, एमआय.डी.सी.महापे, नवी मुंबई) येथे अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत तपासणी केली असता त्या ठिकाणी पनीर तसेच खवा हे अन्नपदार्थ उत्पादित केले जात असल्याचे आढळुन आले. भेसळ होत असल्याच्या संशयावरून हा पदार्थ व भेसळीसाठी लागणारे पदार्थ असा एकूण 10 लाख 47 हजार 294 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाने कळविली आहे.

भास्कर डेअरी या आस्थापनेच्या ठिकाणी पनीर व 'खवा' बनविण्यासाठी रिफाइन्ड पामोलिन तेल ग्लिसरॉल मोनोस्टीयरेट या पदार्थांचा भेसळीसाठी वापर होत असल्याचे आढळले.  सदरचा साठा हा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचा भंग करणारा असल्याचे आढळून आले. या आस्थापनेतून पनीर, खवा, भेसळकारी पदार्थ व इतर असे एकूण 10 अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. हे 10 नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले असून अन्न नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असून अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. 

अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून अन्न पदार्थाच्या भेसळीच्या अनुषंगाने कडक कारवाई घेण्याचे आदेश नुकतेच दिलेले होते. त्यानुसार अन्न प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार व कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (दक्षता/गुप्तवार्ता) उल्हास इंगवले, अन्न सुरक्षा अधिकारी मिलिंद महांगडे, निलेश विशे, अरविंदकुमार खडके, हर्षा येवले व इंद्रजीत चिलवंते यांच्या पथकाने नवी मुंबईत ही कारवाई केली आहे.
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »