महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी मुंबई

अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात दीड कोटी रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त

मुंबई प्रतिनिधी– अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने नुकतेच मुंबई व पालघर  परिसरातील अनेक ठिकाणी  छापे टाकले असून चार खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊकविक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.  सर्व ठिकाणी मिळून एकूण १ कोटी ६० लाख २६ हजार २५९ रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला व एकूण ४० खाद्यतेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले. राज्यातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी हे प्राधान्य लक्षात घेवून, त्यांच्या दैनंदिन आहारातील अन्न पदार्थाचा दर्जा तपासण्याची जाणीव लक्षात ठेवून प्रशासनास प्राप्त होणाऱ्या गोपनीय माहितीच्या आधारे छापे टाकण्याची कार्यवाही करण्यात येते.राज्यातील अन्न व्यवसायाचा दर्जा उंचावणे तसेच अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा देखील या छाप्यांचा हेतू असतो.

मुंबई  आणि पालघर परिसरातील काही खाद्यतेल व्यावसायिकांवर नुकतेच छापे घालण्यात आले. या छाप्यात मुंबई परिसरातील 1) मे. ऑईल वेल ऑईल सेंटर, लोटस कॉलनी, गोवंडी, मुंबई-43  2) मे. जि.के.ऑईल सेंटर, जि.एम.लिंक रोड, गोवंडी, मुंबई -43 व पालघर जिल्ह्यातील 3) मे. ओमकार  ट्रेडींग कंपनी, सातीवली, वसई, जि. पालघर, 4) मे. शिवाय ट्रेडींग कपंनी, सातीवली, वसई पूर्व, जि. पालघर या चार खाद्यतेल उत्पादक व रिपॅकर्स यांच्यावर कारवाई घेण्यात आली.धाडीचा उद्देश व परिणाम तपासता यावा म्हणून प्रथम प्राधान्याने विश्लेषण अहवाल मागवण्यात आले. घेण्यात आलेल्या सर्व नमुन्यांचे विश्लेषण केले असता 40 नमुन्यांपैकी 28 नमुने प्रमाणित व 12 नमुने कमी दर्जाचे  असल्याचे आढळून आले आहेत.

एकूण घेतलेल्या शेंगदाणा तेलाच्या 06 नमुन्यापैकी 06 नमुने (100 टक्के)  कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले. मोहरी तेलाच्या 11 नमुन्यापैकी 03 नमुने (27.27 टक्के) कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले. सोयाबिन तेलाच्या 02 नमुन्यापैकी  02 नमुने (100  टक्के)  प्रमाणीत असल्याचे आढळून आले. सुर्यफुल तेलाच्या 02 नमुन्यापैकी  02 नमुने (100.00 टक्के)  कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले. पामोलिन तेलाच्या 13  नमुन्यापैकी  01 नमुने (7.69 टक्के)  कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले. कॉटनसिड तेलाच्या 02 नमुन्यापैकी 02 नमुने (100 टक्के)  प्रमाणित असल्याचे आढळून आले. राईस ब्रान तेलाच्या 04 नमुन्यापैकी  04  नमुने (100 टक्के)  प्रमाणित असल्याचे आढळून आले.

ही कारवाई श्री शशिकांत केकरे, सह आयुक्त (अन्न), बृहन्मुंबई  विभाग, अन्न व औषध प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.प्रमाणित आढळलेल्या खाद्य तेलाचा जप्तसाठा तात्काळ विक्रीसाठी खुला करण्याचे व अप्रमाणित नमुन्या बाबतीत कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिले आहेत. नागरिकांना अन्न पदार्थाच्या किंवा औषधांच्या दर्जा विषयी काही श्ंका असल्यास प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 वर तक्रार करावी, असे आवाहन अन्न सुरक्षा आयुक्त यांनी केले आहे.

Related Posts
Translate »